Full Width(True/False)

रिंकू आणि प्रार्थनाच्या 'या' चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये सुरू

मुंबई : जाहीर झाल्यामुळे अनेकांच्या कामाला ब्रेक लागला होता. मध्ये बराच काळ गेल्यानंतर आता अनलॉकच्या प्रक्रियेत सारं काही हळूहळू सुरू होतंय. मनोरंजनसृष्टीमध्येही कामाला सुरुवात झाली आहे. मालिकांचं रोजचं चित्रीकरण सुरू झालंय. त्याबरोबरच सिनेमांच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. त्यात मराठी चित्रपटही मागे नाहीत. बऱ्याच मराठी सिनेमांचं चित्रीकरण आता परदेशात होतं. करोनामुळे चित्रपटांच्या बजेटमध्ये काहीशी कपात झाली असली, तरी काही चित्रपट परदेशात चित्रित होणार आहेत. करोनाच्या काळातदेखील मराठी सिनेसृष्टीनं त्यांच्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग परदेशात करण्याचं ठरवलं आहे. 'गच्ची', 'नाळ', 'मन फकीरा' यासारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माते नितीन वैद्य यांच्या 'छूमंतर' या आगामी द्वैभाषिक चित्रपटाचं चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरू झालं आहे. समीर जोशी दिग्दर्शित 'छूमंतर' सिनेमात , , आणि हे कलाकार असणार आहेत. करोनाच्या काळात सिनेमाच्या चित्रीकरणासाठी परदेशी प्रवास करणं हे आव्हानात्मक आहे. याविषयी नितीन वैद्य म्हणाले, की 'सध्याच्या कोविडच्या परिस्थितीत चित्रपट करणं हे तसं आव्हानात्मकच आहे. पण नंतर लक्षात आलं की भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या तुलनेत परदेशात कोविडचा प्रादुर्भाव तुलनेनं कमी आहे. केसेस कमी आहेत आणि धोकाही कमी आहे. म्हणून मी लंडनची निवड केली. यापूर्वी लंडनमध्ये मी अनेकदा चित्रीकरण केलं आहे. या सिनेमासाठी फक्त २० ते २५ जणांचं युनिट आहे. लंडनला रवाना होण्यापूर्वी सावधगिरी आणि काळजी म्हणून मी आमच्या डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार महिनाभराचा इम्युनिटी बूस्ट अपचा कोर्स टीमसाठी चालू केला आहे. भारतातून निघायच्या आधी प्रत्येकाच्या तीन कोविड चाचण्या करुन घेतल्या. त्यांचा चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानंतरच आम्ही चित्रीकरणासाठी रवाना झालो.' या सिनेमाच्या चित्रीकरणाविषयी बोलताना सुव्रत जोशी सांगतो, की 'सध्याच्या परिस्थितीत चित्रीकरणाचा अनुभव काही वेगळाच आहे. शूटिंगमधील सीन्स करताना, सेटवर वावरताना आम्ही सगळे खूप सावधगिरी बाळगतो. संपूर्ण टीम एक ग्रुप म्हणून एकत्र असतो आणि हॉटेल ते सिनेमाचा सेट आणि सेटवरुन पुन्हा हॉटेलवर एवढीच ये-जा करण्याची परवानगी आहे. त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. आणि प्रत्येक जण योग्य ती काळजी घेत आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37kvv20