मुंबई: हिंदीचं १४ वं पर्व सुरू होऊन तीन आठवडे उलटून गेले आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत या शोची गाडी अद्यापही रुळावर आली नसली तरी शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. माझ्या समोर मराठी भाषेत बोलू नकोस, मला मराठीची चीड येते, असं वादग्रस्त वक्तव्य स्पर्धक असलेल्या यानं केलं होतं. त्यामुळं चांगलाच वाद निर्माण झाला. राजकीय पक्षांच्या दबावामुळं वाहिनीकडून तसंच जान कुमार सानू यानं देखील माफी मागितील आहे. मराठीचा हा मुद्दा लक्षात घेऊन मराठी पेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बिग बॉसच्या घरात झिंगाट गाण वाजवलं गेल्याचं पाहायला मिळाल. बिग बॉसच्या घरात दिवसाची सुरुवात ही एका गाण्यानं होते. या गाण्यावर सर्व स्पर्धकांना डान्स करायचा असतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोमध्ये स्पर्धक झिंगाट गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 'बिग बॉस' च्या निर्मात्यांनी शुक्रवारचे दोन प्रोमो शेअर केले. यात राहुल आणि जास्मीन एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या टास्कमध्ये रेड झोनमधील स्पर्धकांना ग्रीन झोनमधील एखादा सदस्य निवडायचा आहे. तसेच ते ग्रीन झोनमध्ये राहण्यास का योग्य नाही हेही पटवून द्यायचं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TFrNbc