Full Width(True/False)

अभिनेत्रींनी सांगितलं त्यांच्या आयुष्यातली दुर्गा कोण?

प्रत्येकीत असतं ते रुप खंबीर, खमकी असलेली माझी आई नेहमीच प्रेरणा देते. माझ्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गीता मॅडम म्हणजे माझ्यासाठी साक्षात सरस्वतीचं रूप आहेत. मी ६-७ वर्षांची असल्यापासून त्या माझ्यासोबत आहेत. आलिया भट, सई, पल्लवी, अनुष्का शर्मा यांसारख्या उत्तम अभिनेत्री मला खूप प्रेरित करतात. माझे बाबा सीआयडीमध्ये होते. तिथे काम करणाऱ्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना मी लहानपणापासून बघत आले. त्या पोलिस खात्यात मोठ्या पदावर आहेत. त्यामुळे त्या खऱ्या आयुष्यात दुर्गेचं रूप आहेत. नम्रता आवटे-संभेरावदेखील मला आवडते. करिअर, संसार यांचा सुरेख समतोल तिनं साधलाय. मेघना पेठे या माझ्या आवडत्या लेखिकेचं लिखाणसुद्धा मला खूप प्रेरणा देतं. प्रत्येक स्त्रीमध्ये हे रूप असतं, ते हेरता यायला हवं. - देवी सदैव सोबतसर्वप्रथम मी माझ्या आईचं नाव घेईन. अत्यंत मेहनती, सगळ्या जबाबदाऱ्या अगदी चोख सांभाळणारं व्यक्तिमत्त्व. तिला जे आवडंतय, पटतंय त्याचा सारासार विचार करून ती तसं वागते. आई स्पष्टवक्ती असल्यानं, माझं काम कसं होतंय, काय सुधारणा हवी हे ती सांगते. माझ्या सहकलाकर, सीनिअर कलाकारांकडून खूप काही शिकायला मिळालं. माझ्या प्रत्येक भूमिकेनं मला शिकवलंय, घडवलंय, माणूस म्हणून समृद्ध केलंय. मी ज्या-ज्या लहान मुलींना भेटते, मग ती माझी पुतणी असो, भाची असो, त्या मला प्रेरित करतात. मी माझ्या लहानपणी जे केलं नाही, ते त्या आता या वयात करताय. सर्व प्राण्यांनाही मी या संकल्पनेत घेईन. कारण ते माझ्यात प्रेम निर्माण करतात. माझ्या घरात देवी आहे. ती सतत माझ्यासोबत असते. मी अडले, पडले तर ती मार्ग दाखवते. तिचा सहवास, भक्ती अधिक शक्ती देते. - स्मिता तांबे स्वावलंबी असणाऱ्या सर्वचमाझ्या आयुष्यातील दुर्गा म्हणून मला एका व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही. ज्या स्त्रिया स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, कोणावरही अवलंबून नाहीत, त्या मला जास्त आवडतात. त्यासाठी प्रत्येक वेळेस स्त्रीत्व वगैरे असायला हवं असं नाही. स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीनं विचार करून, न खचता, न घाबरता शांतपणे वागणाऱ्या स्त्रिया मला खूप प्रेरित करतात. आपली आवड जपणाऱ्या महिलादेखील मला आवडतात. प्रत्येक वेळेस आवडीचा व्यवसाय असायलाच हवा असं नाही. आपली आवड जपून त्यासाठी काम करणाऱ्या महिला मला अधिक प्रिय आहेत. आत्ममग्न असलेल्या अशा अनेक महिलांना मी बघितलंय. - अनिता दाते-केळकर भूमिकाही करतात प्रेरितमाझ्यासाठी नवदुर्गा म्हणजे माझी आई, ताई, माझ्या घरी काम करणा-या बाई, चित्रपटांतल्या विविध भूमिका. चित्रपटातले माझे सहकलाकर हे देखील या संकल्पनेत मोडतात. तसंच कधी-कधी आपण चित्रपट बघतो आणि त्यातली एखादी भूमिकाही आपल्याला भावते, प्रेरित करते. - हेमांगी कवी-धुमाळ सगळ्यांकडून शिकत असतेसगळ्यात आधी माझी आई. निस्वार्थी, खंबीर कसं राहायचं हे आईनं मला शिकवलं. विनम्रता मला माझ्या मावशीनं शिकवली. शृजा प्रभुदेसाई, शाल्मली तोळये या माझ्या पहिल्या सहकलाकर आहेत. अश्विनी ताई माझ्या पहिल्या शोमध्ये सोबत होती. या सगळ्यांकडून मी अनेक गोष्टी शिकले. कोणत्याही सेटवर काम करताना वेशभूषेपासून मेकअप वगैरे करण्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवत असते. पूर्वा, ध्रुवी या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. अगदी सुरुवातीपासून त्या माझ्यासोबत आहेत. कळत नकळतपणेही अनेक महिला आपल्याला बरंच काही शिकवून जातात. या सगळ्याच माझ्यासाठी दुर्गा आहेत. - हृता दुर्गुळे आईची अनेक रूपंमाझ्या आईमध्ये दुर्गेची सगळी रूपं मी पाहिली आहेत. ती शाहीर अमर शेख यांची मुलगी. आजोबांचा अपघात झाल्यावर पूर्ण घराला सांभाळण्याचं काम तिनं खूप लहान असताना केलं. आयुष्यात तिनं फार कष्ट केले आहेत. मी तिला कधीच रडताना, खचलेलं बघितलं नाही. नेहमी खंबीर, सकारात्मक, चेहऱ्यावर हास्य असंच मी तिला बघितलंय. आई खूप सुंदर नृत्य करायची. लोक माझ्या नृत्याचं कौतु करतात. पण, मी तिच्या ५० टक्केही उत्तम नाचत नाही. माझ्यातली सकारात्मकता, माझं नृत्य, माझ्या करिअरच्या प्रती असलेली जिद्द, भावना हे सगळं माझ्यात तिच्यामुळे आलंय. प्रतिकूल परिस्थितीचा सामना कसा करायचा याचं बाळकडू आईनं मला दिलंय. - फुलवा खामकर शब्दांकन - संपदा जोशी


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/354PoYe