Full Width(True/False)

'बाबा निराला'ची काळी बाजू येणार समोर; 'आश्रम'चा दुसरा भाग लवकर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : प्रकाश झा दिग्दर्शित 'आश्रम' ही 'वेब सीरिज' २८ ऑगस्ट या दिवशी 'एमएक्स प्लेअर'वर प्रदर्शित झाली होती. आता या सीरिजच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली असून, येत्या ११ नोव्हेंबरला 'आश्रम' मालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. प्रकाश झा यांनी नव्या सीझनची घोषणा केली असून '' असं या नव्या भागाचं शीर्षक असेल. अभिनेता यानं या वेब सीरिजमध्ये '' या नावाची मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. या मालिकेला विरोध करण्याचा प्रयत्नही काही संघटनांनी केला होता. मात्र प्रेक्षकांनी या मालिकेला उदंड प्रतिसाद दिला होता. पहिला भाग जिथे संपला तिथून नव्या भागाची सुरुवात होईल. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. काय होतं आश्रम -१चं कथानक?'आश्रम'चं कथानक घडतं काशीपूर या काल्पनिक शहरात, जे उत्तर भारतात आहे. काशीपूरमध्येच नव्हे तर, आजूबाजूच्या एकूण वीस मतदारसंघामध्ये काशीपूरवाले बाबा निराला (बॉबी देओल) यांचं साम्राज्य आहे. बाबा निराला यांची लोकप्रियता आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. बाबा निराला यांनी या वर्गासाठी मोठं सामाजिक काम उभं केलं आहे. अशाच एका सामाजिक संघर्षाच्या प्रसंगामध्ये दलित समाजातल्या पम्मीला (आदिती पोहनकर) आणि तिच्या परिवाराला बाबा निराला वाचवतात. त्यातून प्रभावित झालेली पम्मी बाबांच्या आश्रमात साध्वी म्हणून राहायला येते. दरम्यान विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि मोठी वोट बँक पाठीशी असणाऱ्या निरालाबाबाला आपल्या पक्षात खेचण्यासाठी सत्ताधारी पक्षात आणि विरोधी पक्षात रस्सीखेच सुरू होते. बाबा निरालाचा वर्तमानकाळ कितीही झक्क सफेद असला तरी, भूतकाळ काळाकुट्ट आहे. भूतकाळातली काही भूतं त्याच्या मानगुटीवर बसलेली आहेत. वर्तमानकाळामध्येही पडद्याआड बाबाची बरीच कृष्णकृत्य चालूच आहेत. एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आणि एक पत्रकार बाबांच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पाताळयंत्री आणि सर्वार्थाने शक्तिशाली असणाऱ्या बाबा निरालाला कोंडीत पकडणं जवळपास अशक्य असतं. दरम्यान बाबा निरालाच्या कृष्णकृत्यांची झळ पम्मी आणि तिच्या परिवारालाही पोहोचते आणि अजून एका विषम लढ्याला सुरुवात होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lXUoES