मुंबई- 'गजनी' सिनेमातून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळविणारी लग्नानंतर रुपेरी पडद्यापासून दूर झाली आहे. असिनने अभिषेक बच्चन सोबत 'ऑल इज वेल' हा शेवटचा सिनेमा केला होता. नुकताच तिने आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या मुलीचा एक गोंडस फोटो शेअर केला. आसिनच्या मुलीचा अरीनचा नुकताच तिसरा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाचे काही फोटो असिनने सोशल मीडियावर शेअर केले. असिनची मुलगी तीन वर्षांची झाली असिनने मुलीच्या तिसर्या वाढदिवसाचा फोटो पोस्ट केला. यात वाठमोऱ्या अरीनसोबत वाढदिवसाचा केक दिसत आहे. दोन फोटो शेअर करताना असिनने लिहिले की, 'ती आता तीन वर्षाची आहे. अरीन राईन (तिचं पहिलं नाव अरिन) आणि आडनाव (राईन) ही दोन्ही नावं माझ्या आणि राहुलच्या नावाचं कॉम्बिनेशन आहे. छोटं आणि साधं नाव ज्याला कोणतंही लिंग नाही, धर्म नाही, जात नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्ष.' असिनी मुलगी कौतुकाने पाहतेय वाढदिवसाचा केक असिनने पोस्टमध्ये चाहत्यांचे आणि हितचिंतकांचेही आभार मानले. 'प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार.' आरिन या फोटोमध्ये पाठमोरी असली तरी तिच्या चेहऱ्यावर केकला न्याहळताना कोणते भाव असतील हे स्पष्ट दिसेल. जानेवारी २०१६ मध्ये असिनने राहुल शर्माशी लग्न केलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mQUxur