Full Width(True/False)

...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी

मुंबई: बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक अमली पदार्थांची नावं चर्चेत आहेत. हॅश,वीड , या तीन अमली पदार्थांविषयी सध्या चर्चा सुरू आहेत.असं असलं तरी काही जणांकडून गांजा आणि सीबीडी ऑईल सारख्या पदार्थांना कायदेशीर करण्याची मागणी केली जात आहे.दिवंगत अभिनेता याची पत्नी हिनं देखील भारतात सीबीडी ऑईल कायदेशीर करण्यात यावं, अशी मागणी केली आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासानं वेगळं वळण घेतलं आणि बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन समोर आलं. या प्रकरणात रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रित सिंह यांची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली आहे. यात श्रद्धा कपूर हिनं सीबीडी ऑईल खरेदी केल्याचं समोर आलं असलं तरी तिनं ते त्याचं सेवन केलं नसल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमिवर सुतापानं केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये इरफानवर उपचार सुरू होते, सुतापानं लंडमधील त्या हॉस्पिलचा फोटो शेअर केलाय. या फोटोला सुतापानं कॅप्शन दिलंय. ती म्हणते की, या हॉस्पिलच्या त्या खोलीकडं पाहिलं की, इरफान तिथं असल्यासारखं वाटतं'. कॅप्शनसोबतचं तिनं #cancerpain #LegalizeCBDoilinindia हे हॅशटॅग वापरले आहेत. कॅन्सर रुग्णांच्या उपचारादरम्यान सीबीडी ऑईलचा वापर केला जात असल्याचं तिनं म्हटलं आहे. त्यामुळं भारतातही हे ऑईल कायदेशीर करण्यात यावं असं तिनं म्हटलं आहे. सीबीडी ऑईल म्हणजे नक्की काय? कॅनाबिझ (Cannabis) म्हणजेच गांजा. गांज्याची शेती किंवा विक्री करण्यास भारतात मनाई आहे. गांजावर काही प्रक्रिया केल्यानंतर सीबीडी ऑईल तयार केलं जातं. हे तेल विकण्यासही भारतात मनाई आहे. असं असलं तरी वेदनाशमक म्हणून सीबीडी तेल वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. डोकेदुखी आणि मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी तसंच शरीराची काम करण्याची क्षमता वाढवून न झोपता आणि न थकता सलग अनेक तास उत्साहानं काम करण्यासाठी सीबीडी ऑईलचे सेवन केलं जातं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jlZOIR