नवी दिल्लीः वनप्लसने आपला लेटेस्ट फ्लॅगशीप स्मार्टफोन या आठवड्यात लाँच केला आहे. वनप्लसचा हा फोन दोन व्हेरियंटमध्ये येतो. नवीन वनप्लस ८टी चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४५ हजार ९९९ रुपये आहे. आता, नवीन हँडसेट लाँच केल्यानंतर कंपनीने वनप्लस ८ च्या किंमतीत कपात केली आहे. वाचाः वनप्लस ८ च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत ३ हजार रुपयांची कपात केली आहे. या फोनसाठी ४४ हजार ९९९ रुपयांऐवजी आता ४१ हजार ९९९ रुपये मोजावे लागणार आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनसाठी ४९ हजार ९९९ रुपयांऐवजी आता ४४ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. म्हणेजच या टॉप व्हेरियंटच्या फोनवर ५ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. वाचाः ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४१ हजार ९९९ रुपयांऐवजी ३९ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. दरम्यान, हे व्हेरियंट साईटवर उपलब्ध नाही. परंतु, अॅमेझॉन इंडियावरून खरेदी करता येवू शकते. वाचाः वनप्लस ८ स्मार्टफोन ग्लेशियल ग्रीन, इंटरस्टेलर ग्लो आणि ऑनिक्स ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येवू शकते. वनप्लस ८ शिवाय, युजर्संना वनप्लस बुलेट्स वायरलेस २ वर सुद्धा सूट मिळणार आहे. ५ हजार ९९० रुपयात लाँच करण्यात आलेले वायरलेस बुलेट्स ४ हजार ४९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. वनप्लस ८ प्रोटेक्ट योर म्यूझिक बंडलला २ हजार ७८९ रुपयांत लाँच करण्यात आले होते. आता हे २ हजार ५१६ रुपयांत खरेदी करता येवू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k3DT9V