नवी दिल्लीः ओप्पोने ऑगस्टमध्ये इंडोनेशिया आणि भारतात आपला Oppo A53 स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनला गेल्या महिन्यात चीनमध्ये Oppo A32 या नावाने रिब्रँड करण्यात आले आहे. आता ओप्पोचा आणखी एक नवीन ला अॅमेझॉन जर्मनीच्या ओप्पो स्टोरवर लिस्ट करण्यात आले आहे. या लिस्टिंगवरून हँडसेट्सचे वैशिष्ट्ये, फोटो आणि किंमतीची माहिती समोर आली आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये उद्या म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. वाचाः OPPO A53s ची वैशिष्ट्ये अॅमेझॉन जर्मनीच्या लिस्टिंगवरून माहिती झाले आहे की, ओप्पो ए५३ एस मध्ये ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी पॅनल आहे. स्क्रीनवर पंच होल डिझाईन आहे. स्क्रीनचा रिझॉल्यूशन एचडी प्लस आहे. तसेच रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर दिला आहे. वाचाः लिस्टिंगवरून ओप्पो ए५३ एस च्या रॅमची माहिती उघड झाली नाही. फोनमध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज असणार आहे. या फोनमध्ये फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी क्षमता असणार आहे. तसेच १८ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. वाचाः ओप्पोच्या या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये रेक्टाँगल शेप कॅमेरा मॉड्यूल आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. हँडसेटमध्ये रियरवर फिंगरप्रिंट रीडर दिले आहे. वाचाः OPPO A53s ची किंमत ओप्पो ए ५२एस ला अॅमेझॉन जर्मनीच्या वेबसाइटवर १८९ यूरो (जवळपास १६ हजार ३०० रुपये) मध्ये लिस्ट करण्यात आले आहे. हँडसेट फॅन्सी ब्लू आणि इलेक्ट्रिक ब्लॅक कलर मध्ये येतो. कंपनी प्री ऑर्डर बंडल अंतर्गत फोन खरेदीवर युजर्संना ७७ यूरो म्हणजेच ६६५० रुपयांची Oppo W31 TWS इयरबड्स फ्री देत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33OR8VX