नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर विवो लवकरच भारतात नवीन लाँच करणार आहे. स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर केली नाही. परंतु, लाँचिंग आधी फोनची किंमत समोर आली आहे. रिलायन्स डिजिटल आणि क्रोमा यासारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सने फोनची किंमत उघड केली आहे. लिस्टिंगच्या माहितीनुसार, विवो व्ही २० एसई च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये असणार आहे. हा फोन ग्रेवटी ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येईल. वाचाः परंतु, थोड्यावेळानंतर क्रोमा वेबसाइटवरून फोनला हटवले आहे. हा स्मार्टफोन मलेशिया बाजारात आधीच लाँच करण्यात आलेला आहे. या ठिकाणी या फोनची किंमत ११९१ मलेशियाई रिंग्गीत (जवळपास २१ हजार ३०० रुपये) ठेवण्यात आली आहे. वाचाः Vivo V20 SE फोनचे खास वैशिष्ट्ये विवोच्या या फोनमध्ये ६.९९ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा गुगल अँड्रॉयड ११ वर आधारित FunTouch OS 11 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. यात ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. तसेच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा आणि सिंगल फ्रंट कॅमेरा मिळतो. रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सुपर नाइट फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4,100mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2J6awWD