Full Width(True/False)

Airtel vs Jio vs Vi: फ्री डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंगचे बेस्ट प्लान, ८४ दिवसांची वैधता

नवी दिल्लीः भारताच्या टेलिकॉम मार्केटमध्ये रिलायन्स जिओ आणि एअरटेलचा कब्जा आहे. खूप सारे प्रीपेड प्लान्स कंपन्या ऑफर करते. डिसेंबर २०१९ मध्ये सर्व कंपन्यांचे प्लान्स महाग झाल्यानंतर ८४ दिवसांची वैधता असलेला प्लानसाठी युजर्संना ६०० रुपये ते ७०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहे. जर तुम्हाला कमी किंमतीत मोठी वैधताचे प्लान्स हवे असेल तर एअरटेल, जिओ आणि वोडाफोन-आयडियाचे तीन प्लान्स ऑफर केले जात आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री डेटा मिळू शकतो. वाचाः रिलायन्स जिओचा ३२९ रुपयांचा प्लान जिओ युजर्ससाठी ३२९ रुपयांचा प्लान आहे. यात एकूण ६ जीबी डेटा आणि ८४ दिवसांची वैधता मिळते. यात जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग शिवाय, बाकीच्या नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी ३ हजार एफयूपी मिनिट मिळते. प्लानला १ हजार फ्री एसएमएस शिवाय जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन ऑफर करते. वाचाः एअरटेलचा ३७९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये युजर्संना ६ जीबी डेटा मिळतो. पूर्ण वैधतेसोबत ९०० एसएमएस ऑफर केले जाते. प्लान सोबत एअरटेल एक्स्ट्रीम अॅपचे प्रीमियम सब्सक्रिप्शन मिळते. प्लान Shaw Academy फ्री कोर्स शिवाय, १५० रुपयांचे फास्टटॅग बेनिफिट्स ऑफर करतो. वाचाः Vi चा ३७९ रुपयांचा प्लान वोडाफोन - आयडिया कडून ऑफर केला जात असलेला ३७९ रुपयांच्या प्लानमध्ये ६ जीबी ४ जी डेटाशिवाय, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते. याशिवाय, ८४ दिवसांची वैधता मिळते. १००० एसएमएस मिळते. याशिवाय, Vi Movies & TV अॅप्लिकेशन चे अॅक्सेस मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pDtPYm