Full Width(True/False)

Bigg Boss weekend ka vaar: हे वागणं बरं नव्हे... सलमान खान पवित्रावर भडकला

मुंबई: बिग बॉसच्या १४ व्या सीझनला म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नसला तरी शोचा होस्ट म्हणजेच सुत्रसंचालक ही कमी काहीशी भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो. 'विकेंड का वार'मध्ये सलमान असं काही तरी करतो की, शो चर्चेत येतो. आजचा 'विकेंड का वार' असाच मजेशीर असणार आहे. एक स्पर्धक बेघर होणार आहे तर सलमान खान कोणाची शाळा घेणारे? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पवित्राची कानउघणी नुकताच एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान हिची शाळा घेताना दिसतोय. तिला तो चांगलेच खडेबोल सुनावतो. आणि पवित्रा यांच्यात झालेल्या भांडणावरून सलमान पवित्राची शाळा घेतो. पवित्रानं एजाजला काही शिव्या दिल्या होत्या, याच मुद्यावरून सलमान तिला बोलतो. जे काही झालं ते ठिक नव्हतं, असं सलमान म्हणतो. दरम्यान, कविता कौशिकला बिग बॉसच्या स्पर्धक म्हणून घरात पुन्हा प्रवेश करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. पण त्यासाठी तिला बिंदू दारा सिंग, काम्या पंजाबी, आरती सिंह आणि सुरभी चंदना या खास सेलिब्रिटींना प्रभावित करावं लागणार आहे. यावेळी चारही सदस्य कविता घरात ज्या पद्धतीने वागली त्यावर चर्चा करतात. यावर कविता आपलं स्पष्टीकरणही देते. यानंतर सलमान चारही सेलिब्रिटींना कविताला परत घरात पाठवायचं की नाही असा प्रश्न विचारतो. यावर चौघंही एकमताने होकार देतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2U8g8lr