Full Width(True/False)

१० पॉइन्टने जाणून घ्या ड्रग्ज केसमध्ये कसं आलं अर्जुन रामपालचं नाव

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज अँगल समोर आला. त्यानंतर, नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरो () देखील या प्रकरणाच्या तपासात गुंतली. एनसीबीच्या चौकशीत आता नवीन नाव समोर आलं ते म्हणजे . अर्जुनच्या घरावर एनसीबीने छापा टाकला असून आता त्याची चौकशीही केली जाणार आहे. या १० मुद्द्यांकडे नजर टाकून पाहू या प्रकरणात आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी घडल्या. १. सुशांतच्या मृत्यूनंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने आर्थिक फसवणूकीच्या आरोपावरून रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांची चौकशी सुरू केली होती. या चौकशीदरम्यान त्यांचे काही व्हॉट्सअप चॅट उघडकीस आले. ज्यात स्पष्ट झालं की रिया आणि शौविक ड्रग्ज विकत घ्यायचे. २. ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर ईडीने पुढच्या तपासणीसाठी एनसीबीला संपूर्ण चॅटची माहिती दिली. यानंतर एनसीबीने या चॅटशी संबंधित सर्व लोकांची चौकशी सुरू केली. प्रदीर्घ चौकशीनंतर एनसीबीने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा कर्मचारी सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना अटक केली. ३. दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग यांही ड्रग्ज चॅटची चौकशी केली गेली. या चौकशीत सुशांत ड्रग्ज घ्यायचा असा आरोप सारा आणि श्रद्धाने केला होता. असं असलं तरी रकुलप्रीत आणि दीपिका यांच्यासह प्रत्येकानेच त्या ड्रग्ज घेत नसल्याचं स्पष्ट सांगितलं. ४. यानंतर एनसीबीने मुंबईतील नावाजलेल्या भागात ड्रग्ज विक्री करणाऱ्या अनेक पेडलर्सना अटक केली. त्यांच्या चौकशीत धर्मा प्रोडक्शन्सचा माजी कार्यकारी निर्माता क्षितीज प्रसादला अटक केली. क्षितीजच्या घरावर मारलेल्या छाप्यात त्याच्याकडून काहीप्रमाणात ड्रग्जही जप्त करण्यात आली होती. ५. एनसीबीने दीपिकाची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरीही छापा टाकला होता. यात तिच्या घरी चरस आणि सीबीडी तेलाच्या काही बाटल्या सापडल्या. यानंतर करिश्माची पुन्हा चौकशी केली गेली. ६. एनसीबीने त्यांचा तपासात ओमेगा गोडविन या नायजेरियन नागरिकाला ड्रग्जसह अटक केली. याच कथित ड्रग्ज पेडलरकडून अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलचा भाऊ अगिसियालोस डेमेट्रिएड्सचं नाव समोर आलं. एनसीबीला अगिसियालोसकडून हशीश आणि एलप्राजोलमच्या काही गोळ्या देखील मिळाल्या ज्यावर कायदेशीर बंदी आहे. ७. एनसीबीचा असा दावा आहे की अगिसियालोस हा ड्रग सिंडिकेटचा एक भाग आहे. चौकशीत हेही देखील समोर आलं की, अगिसियालोसचा त्या सर्व ड्रग्ज पेडलर्ससोबत संबंध आहे ज्यांच्याकडून रिया, शौविक, दिपेश आणि सॅम्युअल सुशांतसाठी ड्रग्ज विकत घ्यायचे. ८. अगिसियालोसच्या अटकेनंतर एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला. या छाप्यात टीमला एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी घालण्याच आलेली काही औषधं सापडली. त्यानंतर अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेयसी गॅब्रिएला यांना चौकशीसाठी समन्स बजावला. ९. रविवारी एनसीबीने बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरावर छापा टाकला. फिरोजच्या घरातून एनसीबीने काही औषधं जप्त केल्याची माहिती आहे. छाप्यादरम्यान नाडियाडवाला त्यांच्या घरी उपस्थित नव्हते. पण नंतर फिरोज यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. १०. एनसीबीने आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत रिया चक्रवर्ती यांच्यासह सुमारे २८ जणांना ताब्यात घेतलं आहे. जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर रियाची जामिनावर सुटका झाली. पण तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती अजूनही तुरुंगात आहे. शौविकने न्यायालयात नवीन जामीन अर्ज दाखल केला असून, त्यावर अद्याप सुनावणी झाली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38uOdoa