Full Width(True/False)

एअरटेलने रिलायन्स जिओला मागे टाकले, तरीही जिओ नंबर १

नवी दिल्लीः नवीन युजर जोडण्यात एअरटेलने रिलायन्स जिओला मागे टाकले आहे. ट्रायच्या लेटेस्ट डेटाच्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये एअरटेलने २०.९ लाख नवीन युजर जोडले आहे. यासोबतच एअरटेलचे एकूण वायरलेस सब्सक्रायबर्सची संख्या ३२.८ कोटी झाली आहे. तर जिओने ऑगस्ट २०२० मध्ये जिओ नेटवर्कने १८.६ लाख युजर जोडले आहेत. नवीन युजरला जोडण्यासोबतच जिओच्या सब्सक्रायबर्स बेस ४०.२७ कोटी झाले आहे. एकूण यूजर बेसमध्ये जिओ अन्य कंपन्यांच्या तुलनेत पुन्हा एकदा नंबर वन स्थानी आहे. वाचाः एअरटेलकडे सर्वात जास्त अॅक्टिव युजर ट्रायच्या डेटा नुसार जिओकडे एकूण युजरपैकी ७८.८ टक्के अॅक्टिव युजर आहेत. तर एअरटेलकडे अॅक्टिव युजर्सची संख्या ९६.८५ टक्के आहे. वोडाफोन यावेळी सुद्धा नुकसानमध्ये आहे. ऑगस्ट मध्ये कंपनीला १२.३ लाख युजर्सचे नुकसान सोसावे लागले आहे. भारतात वोडाफोनचे एकूण युजर्स बेस ३०.०१ कोटी आहे. तसेच यांच्या अॅक्टिव युजर्सची संख्या ८८.१८ टक्के आहे. वाचाः अॅक्टिव युजर बेसमध्ये आली होती घसरण तिन्ही कंपन्याच्या अॅक्टिव युजर बेसमध्ये थोडी घसरण पाहायला मिळाली आहे. जिओकडे सध्या ८.७८ कोटी इनअॅक्टिव युजर आहेत. तर एअरटेलच्या इनअॅक्टिव युजर्सची संख्या १.०१ कोटी आहे. वोडाफोनच्या इनअॅक्टिव युजर्सची संख्या ३.५४ कोटी आहे. इनअॅक्टिव युजर्सचा पत्ता विजिटर लोकेशन रजिस्टरवरून माहिती होतो. अॅक्टिव युजर्सचा पत्ता युजर्सच्या लोकेशनवरून माहिती होतो. ही एक तात्पुरता डेटाबेस असतो. युजर जर कॉलिंग आणि एसएमएस सर्विस युज करीत असेल तर याचा अर्थ व्हीआरएलमध्ये उपलब्ध आहे. हे अॅक्टिव आणि इनअॅक्टिव युजरची खरी माहिती देते. वाचाः वायरलेस युजर्संची संख्या वाढली डेटानुसार, देशात वायरलेस युजर (2G, 3G, 4G)ची संख्या ११४.४१ कोटी वाढून ती जुलैमध्ये ११४.७९ कोटीवर पोहोचली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38wXKes