मुंबई- आणि दोघंही त्यांच्या नात्याबद्दल फारसं काही बोलत नसले तरी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. थँक्सगिविंग २०२० च्या निमित्ताने मलायकाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात तिच्या आयुष्यातले काही खास क्षण आणि महत्वाचे लोक दाखवले होते. व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर बर्याच ठिकाणी दिसत होता. आता मलायकाने तिचा आणि अर्जुनचा एक नवीन फोटो शेअर केला आहे. मलायका अरोराची नवी पोस्ट मलायका अरोराने रविवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांच्या मिठीत विसावलेले दिसत आहेत. दोघेही एकमेकांसोबत अविस्मरणीय क्षण घालवताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, 'जेव्हा तू सोबत असतोस तेव्हा एकही क्षण निरुत्साही नसतो.' अर्जुन आणि मलायका यांनी धर्मशाला येथे साजरी केली दिवाळी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी काही दिवसांपूर्वी धर्मशाला येथे काही दिवस एकत्र घालवले. अर्जुन तिथे सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिससोबत भूत पोलीस सिनेमाच्या चित्रीकरणाला गेला होता. यावेळी करिना कपूर आणि मलायकाही त्यांना कंपनी द्यायला गेली. दिवाळी दरम्यान मलायका अर्जुनला भेटायला थेट धर्मशाला येथे गेली होती. काही दिवस एकत्र घालवल्यानंतर ती मुंबईत परतली. अर्जुन कपूरची पोस्ट काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूरने स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, 'जेव्हा ती तुमच्याकडे पाहते तेव्हा..' या फोटोवर कमेन्ट करताना मलायका अरोराने विचारलं 'कोण?' यावर उत्तर देताने अर्जुन म्हणाला की, 'तूच विचार कर याचा!'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2KSDCtC