Full Width(True/False)

सासू -सूनेचं चांगलंच जमलंय ; मराठी मालिकांमध्ये नवा ट्रेंड

संपदा जोशीसासू आणि सून यांचं छान गूळपीठ जमलंय,दोघीही एकमेकींना छान सांभाळून घेत आहेत हे चित्र आता मराठी मालिकांमध्ये दिसून येऊ लागलंय. एकमेकींना नेहमी पाण्यात पाहणाऱ्या सासवा-सुनांचा ट्रेंड जाऊन त्याऐवजी घरात गुण्यागोविंदानं राहणाऱ्या दोघी जणी दिसून येत आहेत., 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमध्ये गुरूनाथचे कारनामे बघून त्याच्या आईनं सून राधिकाला साथ दिली. स्वतःच्या मुलाच्या विरोधात उभं राहून सासू सूनेला सर्वतोपरी मदत करताना दिसतेय. तर दुसरीकडे '' मालिकेत नुकतंच अनिरुद्धचं पितळ घरच्यांसमोर उघड पडलं. अनिरुद्धच्या आईनं अरूंधतीची बाजू घेतल्याचं दिसून येत आहे. याही मालिकेत सासू सूनेसाठी मुलाशी भांडताना दिसते आहे. '' मालिकेत बबड्याचं वागणं असह्य झाल्यानं आसावरी त्याच्यावर रागावली आहे. आसावरी आणि शुभ्रा एकत्र असून, आता बबड्याचं काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 'सहकुटुंब सहपरिवार'मध्ये सरू आणि तिच्या जावा यांचं व्हिलचेअरवर असलेल्या सासूशी चांगलं नातं आहे. 'शुभमंगल ऑनलाइन'मध्ये नवी सून शर्वरी आणि तिच्या सासूमध्ये चांगलं नातं आहे. शर्वरीमुळे तिच्या सासूची बालपणीची मैत्रीण तिला परत मिळालीय. 'श्रीमंताघरची सून' ह्या नव्यानं सुरू झालेल्या मालिकेच्या प्रोमोमध्ये तरी सून तिच्या सासूच्या बाजूनं उभं राहताना दिसली आहे. प्रेक्षकांनी आजवर सासू आणि सून यांच्यातले वाद मालिकांत पाहिले असून, हा नवा सकारात्मक बदल प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय. 'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते' ही बहिणाबाईंची ही ओळ सध्याच्या सासू-सून टीम ट्रेंडसाठी अगदी योग्य आहेत. मुलं आईच्या बाबतीत फार हळवी असतात. मला वाटतं सुखी संसारासाठी सासू आणि सुनेचं जुळणं फार महत्त्वाचं असतं. मुलाच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीनंही ही गोष्टं खूप चांगली आहे. त्यामुळे मालिकांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा विचार मला आवडतोय. - तेजश्री प्रधान, (अग्गंबाई सासूबाई) पूर्वीसुद्धा सासू-सुनेचं चांगलं होतं. पण थोडं नाट्य येण्यासाठी त्यांच्यात एकमेकींवर कुरघोडी वगैरे दाखवायला सुरुवात झाली. आता सगळीच नाती वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न होतोय. हा खरंच चांगला ट्रेंड आहे. सासू- सूनेचा हा बदलणारा ट्रेंड लेखक म्हणून नक्कीच स्वागतार्ह आहे. कारण वेगळं लिहिता, मांडता येतंय आणि प्रेक्षकांनी तो आनंदानं मान्य केलाय. 'सासू वाईटच असते' हा समज होता नाहीसा झालाय. सासू चांगलीसुद्धा असते, वेळप्रसंगी ती सूनेच्या पाठीशी उभी राहते, हेच हा ट्रेंड सांगतोय. - मुग्धा गोडबोले, संवादलेखिका, (आई कुठे काय करते) सासू आणि सून या नात्याबद्दल सतत नकारात्मक गोष्टीचं दाखवल्या जात होत्या. खरं बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस असं नसतं. जेव्हा जेव्हा मालिकेत सकारात्मक बदल दाखवले आहेत, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. कोणतही नातं परफेक्ट नसतं. पण आतापर्यंत सासू-सुनेचं नातं नकारात्मक दृष्टीनं दाखवलं गेलंय. हे समीकरण सकारात्मक दृष्टीनं दाखवणं गरजेचं आहे. टीव्ही आणि मालिकांचा समाजावर परिणाम होत असतो. त्यामुळे हा बदल चांगला आहे. - जितेंद्र गुप्ता, लेखक, (शुभमंगल ऑनलाइन)


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39ixp4s