मुंबई: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर यानं वडिल यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी वडिल म्हणून माझी कोणतीही जबाबदारी पार पडली नाही, असा आरोप त्यानं कुमार सानू यांच्यावर केला होता. या आरोपांवर कुमार सानू यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. कुमार सानू यांनी जानच्या या वक्तव्यावर आणि आरोपांवर नाराजी व्यक्त केली आहे.‘बॉलिवूड लाइफ’ला मुलाखत दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर त्यांची बाजू मांडली आहे. 'मी जानबद्दल काहीच वाईट असं बोललो नाहीए. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. काही गोष्टी त्यानं शिकायला हव्या होत्या, असंच मी म्हटलं होतं. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी भाषेचा सन्मान केलाच पहिजे, हे शिकवलं गेलं पाहिजे, मी हेच म्हणालो होतो', असं कुमार यांनी म्हटलं आहे. आईनं मागितलेली प्रत्येक गोष्ट दिली'मी जानसाठी काहीच केलं नाही, असं तो म्हणाला, या गोष्टीचं मला फार वाईट वाटलं. आमचा घटस्फोट झाला तेव्हा जान लहान होता. त्याला काही गोष्टींची कल्पना नाहीए. त्याच्या आईनं मागितेली प्रत्येक गोष्ट मी दिली आहे. आशिकी बंगलाही मी त्यांना दिला आहे. त्यानं त्याच्या आईचं नाव लावावं अनेक मुलाखतीत जान यानं त्याची आई हिच त्याच्यासाठी वडिलांसमान असल्याचं म्हटलं आहे. ही एक चांगलीच गोष्ट आहे. त्यानं या नात्याला सन्मान देण्यासाठी करावी, ती म्हणजे त्यानं त्याच्या आईचं नाव लावावं. असं वापरता जान अशी ओळख त्यानं सर्वांना सांगावी, असंही कुमार सानू म्हणाले. काहीचं केलं नाही मी?माझ्या शोमध्ये मी त्याला घेतलं. इतकंच नाही तर महेभ भट्ट, रमेश तौरानी आणि इतर काही प्रसिद्ध लोकांसोबत मी त्याची भेट घडवून दिली आहे. त्यांनी जानला संधी द्यायची की नाही, हे सर्व त्यांच्याच हातात आहे, जानच्या टॅलेन्टवर आहे, यावर मी काहीही बोलू शकत नाही. असं कुमार सानू म्हणाले. कधीही भेटणार नाहीजान आणि मी अनेकदा अधुनमधून भेटायचो, पण आता त्याची इच्छा असली तरी मी त्याला भेटणार नाही, असं म्हणत कुमार सानू यांनी जानवील नाराजी उघडपणे व्यक्त केली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nUy4Nh