Full Width(True/False)

'नग्न होणं अपराध तर नागा बाबांनाही अटक करा,' अभिनेत्रीची मिलिंदला साथ

मुंबई- प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेते यांनी त्यांच्या वाढदिवसाला गोव्याच्या किनाऱ्यावर धावतानाचा एक नग्न फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अगदी काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला. अनेकांनी आपल्या प्रतिक्रियावर देत वादंग निर्माण केला. मिलिंद आणि त्यांची पत्नी अंकिता कोंवर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली. या सगळ्यात अभिनेत्री हिने मिलिंदचं समर्थन केलं आहे. दक्षिण गोव्याच्या बीचवर नग्न धावणाऱ्या मिलिंद सोमण यांच्या या फोटोत काहीच अश्लिल नसल्याचं पूजा बेदी म्हणाली. तसंच यात कोणतीही अश्लीलता नसून कलात्मकता असल्याचंही तिने स्पष्ट केलं. ट्विटरवर आपलं मत मांडताना तिने लिहिले की, 'मिलिंद सोमणच्या या कलात्मक फोटोत कोणतीही अश्लिलता नाही. अश्लीलता पाहणाऱ्याच्या मनात असते. त्याचा गुन्हा इतकाच आहे की तो गुड लुकिंग, फेमस आणि नवनवीन बेन्चमार्क सेट करत आहे. नग्नता हा गुन्हा असल्यास सर्व नागा बाबांना अटक केली पाहिजे. फक्त शरीरावर राख लावली म्हणून याचा स्वीकार केला जाऊ शकत नाही.' मिलिंद यांचा नग्न फोटो शेअर झाल्यानंतर त्यांच्याविरूद्ध अश्लीलता पसरवल्याबद्दल दक्षिण गोवा जिल्ह्यातील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयावर मिलिंदची पत्नी अंकिता कोंवर यांनी बॉम्बे टाइम्सला सांगितलं की मिलिंद यांनी विचार न करता हे केलं. या फोटोतून लोकांना सकारात्मक संदेश देण्याचाच त्यांचा मुख्य हेतू होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38n2QtO