मुंबई- अलीकडेच भूमी पेडणेकर हिने तिच्या आगामी '' या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं होता. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाचं नाव पूर्वी 'दुर्गावती' ठेवण्यात आलं होतं. पण नंतर ते बदलून दुर्गामती करण्यात आलं. या सिनेमात भूमी आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तिच्यात राणी दुर्गामतीच्या आत्मा प्रवेश करतो आणि नंतर खऱ्या नाट्याला सुरुवात होते. तेलगू सिनेमा 'भागमती' चा हा हिंदी रिमेक आहे. मूळ सिनेमात अभिनेत्री अनुष्का शेट्टीने मुख्य भूमिका साकारली होती. अनुष्काच्या या भूमिकेच अनेकांनी कौतुकही केलं होतं. काय आहे ट्रेलरमध्ये- या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ईश्वर प्रसाद हा एक प्रामाणिक नेता असतो. या नेत्याची भूमिका अर्शद वारसीने साकारली आहे. काही भ्रष्ट राजकारणी ईश्वर प्रसाद विरोधात कट रचतात. या सिनेमात एका कठोर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. माही तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या निलंबित आयएएस चंचल चौहान (भूमी पेडणेकर) हिला ईश्वर प्रसादविरोधात जबाब देण्यास सांगते. यावेळी चंचलच्या चौकशीसाठी एक जुना किल्ला निवडण्यात येतो. चंचलमध्ये राणी दुर्गामतीचा आत्मा कसा ? राणी कोणाचा सूड घेण्यासाठी आली आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सिनेमा पाहिल्यानंतरच मिळेल. या सिनेमात जीशु सेनगुप्ता याचीही एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अक्षय कुमारदेखील आहे एक निर्माता नुकताच प्रदर्शित झालेल्या 'लक्ष्मी' या भयपटात दिसणारा या सिनेमाचा सह-निर्माता आहे. यावर्षी जानेवारीत सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं. मध्य प्रदेशातील एका जुन्या किल्ल्यात सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण झालं आहे. अशोक दिग्दर्शित हा सिनेमा ११ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर ऑनलाइन प्रदर्शित होणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39deKXv