Full Width(True/False)

कंगनाच्या अडचणी वाढल्या; मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई: हिंदू व मुस्लिम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि समाजातील सौहार्दपूर्ण वातावरण व जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतूनं सोशल मीडियावर वारंवार विधानं केल्या प्रकरणी कंगनाविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून कंगनाला पुन्हा एकदा चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर हिनं केलेल्या एका आक्षेपार्ह ट्वीटविरोधात दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि तिची बहीण यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडीयावर दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चौकशीसाठी कंगनाला १० नोव्हेंबर आणि रंगोली हिला ११ नोव्हेंबर रोजी हजर राहावे, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? दिग्दर्शक साहिल सय्यद यांनी प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता.पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्यानं त्यांनी कोर्टात धाव घेतली . त्यानंतर कोर्टानेंकंगना आणि तिच्या बहिणी विरोधात १५२३ A, २९५ A, IPC १२४ A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यांनी देखील कंगना व रंगोलीविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. '१५ एप्रिल रोजी रंगोलीने विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणारा व्हिडिओ ट्विटवर पोस्ट केला होता. त्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट ट्विटरने काही काळासाठी बंद केले. मात्र, नंतर कंगनाने रंगोलीच्या विधानांचे समर्थन केले. त्यानंतर १८ एप्रिलला कंगनाने एक व्हिडीओ तयार करून विशिष्ट समुदायाचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला. विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याने मी अंधेरीमधील अंबोली पोलिसांत तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही', असे अली यांनी आपल्या तक्रारी म्हटले. तसेच दोघी बहिणींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ (वेगवेगळ्या धर्मांमध्ये व समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे), कलम १५३-ब (देशाच्या एकात्मतेला धक्का लावण्याचा प्रयत्न करणे), कलम २९८ (धार्मिक भावनांना ठेच पोचवणे) व कलम ५०५ (सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणे) अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी विनंती केली. न्या. भागवत झिरपे यांनी तक्रारीची दखल घेऊन कथित व्हिडिओ नोंदीवर नसल्याने आणि यातील पुरावे इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे असल्याने पोलिसांकडून चौकशी अहवाल मागवणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच त्याप्रमाणे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अंबोली पोलिसांना दिले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mOZzr7