Full Width(True/False)

अमरावतीत जन्मलेले आसिफ बसरा, जाणून घ्या त्यांच्या आयुष्याबद्दल

मुंबई- यंदाचं वर्ष बॉलिवूडसाठी काळं वर्ष ठरलं. हे वर्ष केव्हा संपेल याचीच लोक वाट पाहत असताना बॉलिवूडकरांसाठी अजून एक दुःखद बातमी समोर आली. चित्रपट आणि टीव्ही अभिनेते यांनी गुरुवारी धर्मशाळा येथे गळफास लावून आत्महत्या केली. आसिफ यांचा मृत्यू नक्की कसा झाला आणि त्यांनी आत्महत्या का केली हे अजून कळू शकलेलं नाही. त्यांच्याजवळ कोणतीही सुसाइड नोटही मिळालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ नैराश्यग्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. इथे आम्ही तुम्हाला आसिफ बसरा आणि त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही महत्त्वपूर्णम माहिती देणार आहोत.. १. आसिफ बसरा कोण होते? आसिफ बसरा हे बॉलिवूड आणि टीव्हीसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता होते. त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे. नाट्यप्रेमी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. २. आसिफ बसरा यांचा जन्म कधी आणि कुठे झाला? आसिफ यांचा जन्म २७ जुलै १९६७ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. ते ५३ वर्षांचे होते. ३. आसिफ बसरा यांनी कोणत्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं? आसिफ बसरा यांनी आपल्या करिअरची सुरूवात ‘वो’ या टीव्ही मालिकेतून केली होती. अलीकडेच ते 'हॉस्टेजेस' या वेब सीरिजमध्येही दिसले होते. याशिवाय १९९८ मध्ये आलेली हॉरर सीरिज 'X Zone' मध्येही काम केलं होतं. ४. आसिफ बसरा यांनी कोणत्या सिनेमांत काम केलं? आसिफ बसरा यांनी 'ब्लॅक फ्रायडे', 'परजानिया', 'काय पो छे', 'जब वी मेट', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'क्रिश ३', 'एक व्हिलन', 'मंजुनाथ', 'कालाकांडी', 'फ्रिक्की अली' आणि 'द ताश्कांत फाइल्स' यांसारख्या नावाजलेल्या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या. ५. आसिफ बसरा यांचं शिक्षण काय झालं? आसिफ बसरा यांनी भौतिकशास्त्रात बीएससी केलं होतं. याव्यतिरिक्त एक संगणक कोर्सही केला होता. ६. आसिफ बसरा यांनी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं होतं का? असं म्हटलं जातं की आसिफ यांनी अभिनयाचं कोणतेही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. अगदी लहान वयातच त्यांनी स्टेजवर अभिनय करण्यास सुरुवात केली होती. ७. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी आसिफ बसरा काय काम करायचे? पदवी आणि त्यानंतर संगणक कोर्स केल्यानंतर आसिफ मुंबईत कामाला लागले. तसेच जो काही पगार मिळायचा तो सर्व ते नाटक पाहण्यासाठी खर्च करायचे. नाटकांमधून त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. ८. अभिनयाशिवाय इतर कोणती कामं करायचे आसिफ? आसिफ मुंबईत अभिनयाशिवाय पृथ्वी थिएटरमधील तरुणांना अभिनयाचे प्रशिक्षण द्यायचे. ९. आसिफ बसरा यांचं लग्न झालं होतं का? त्यांच्या कुटुंबात अजून कोण आहे? आसिफ बसरा यांच्या विवाहित जीवनाबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाविषयी इण्टरनेटवर सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. १०. आसिफ बसरा यांचा मृत्यू कसा झाला? आसिफ बसरा यांनी हिमाचल प्रदेशातील कांगरा जिल्ह्यातील धर्मशाला येथे आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंं आहे. आसिफ बसरा गेल्या पाच वर्षांपासून मॅकलॉडगंज येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची यूकेमधील एक मैत्रीणही राहत होती. दोघं लिव्ह इनमध्ये राहत होते. गुरुवारी, १२ नोव्हेंबर रोजी आसिफ त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेले. घरी परतल्यावर त्यांनी कुत्र्याच्या पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. प्राथमिक तपासात ते नैराश्यग्रस्त असल्याचं समोर आलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Ulnjaa