Full Width(True/False)

Cowin मध्ये नवीन अपडेट, व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये नाव आणि जन्मतारीख बदलता येणार

नवी दिल्ली. कोविन पोर्टलसाठी सरकारने एक नवीन अपडेट जारी केले आहे. या अपडेटनंतर आपण कोविनवरच आपल्या लस प्रमाणपत्रात कोणतीही चूक असल्यास ती सुधारू शकाल. नोंदणी दरम्यान नाव किंवा जन्मतारखेमध्ये काही चूक झाली असेल तर आपण कोवीन पोर्टलवर लॉग इन करून ते सुधारू शकता. आरोग्य सेतूद्वारे ट्विट करून कोविन पोर्टलच्या नव्या अपडेटची माहिती देण्यात आली आहे . प्रमाणपत्रातील कोणतीही चूक सुधारण्यासाठी आता 'राईस अ इश्यू' हा पर्याय कोव्हिन पोर्टलवर पलब्ध होईल. लसीकरण प्रमाणपत्र कसे सुधारित करावे
  • लिंग, जन्म तारीख, नाव इत्यादी संदर्भात तुमच्या लस प्रमाणपत्रात काही चूक असल्यास शासनाने त्यामध्ये ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा दिली आहे.
  • लस प्रमाणपत्रातील कोणतीही चूक सुधारण्यासाठी आपण प्रथम आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकासह कोव्हिन पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
  • त्यानंतर आयडी (एकाधिक नोंदणीच्या बाबतीत) निवडावे लागेल जे दुरुस्त करावे लागतील.
  • त्यानंतर त्या आयडीखाली तुम्हाला 'राईस ए इश्यू' चा पर्याय दिसेल. क्लिक केल्यानंतर आपणास लिंग, जन्मतारीख, नाव इत्यादी दुरुस्त करण्याचे पर्याय मिळतील.
अनेक देश आणि राज्यांत प्रवास करण्यासाठी लस प्रमाणपत्र अनिवार्य झाले आहे. अशा परिस्थितीत प्रमाणपत्रात कोणतीही चूक आपल्याला अडचणीत आणू शकते. आपल्या ओळखपत्र आणि लस प्रमाणपत्रात समान माहिती असावी. गेल्या महिन्यातच भारत सरकारने आरोग्य सेतु अ‍ॅपवर लोकांना ब्लू टिक देण्याची घोषणा केली आहे. आरोग्य सेतु अ‍ॅपवर निळ्या रंगाचे टिक्स अशा लोकांच्या खात्यांवर उपलब्ध असतील ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आरोग्य सेतू अ‍ॅपवर ज्यांना लसी दिली जाईल त्यांना ब्लू टिक आणि निळा शील्ड मिळेल. याचा फायदा असा आहे की, ज्या लोकांना ही लस मिळाली आहे त्यांची ओळख केवळ आरोग्य सेतु अपवरूनच होईल.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g59mIW