Full Width(True/False)

रितेश आणि जेनेलिया यांची 'आशेची रोषणाई' ...एक खास संदेश

मुंबई : दिवाळीचा सण आनंद-उत्साह घेऊन येत असला, तरी करोनाचं संकट, लॉकडाउन यामुळे अनेकांच्या आयुष्यातला आनंद हरवला आहे. समाजातील काही घटक कठीण परिस्थितीशी सामना करत असून, त्यांच्या उत्साहाला नेहमीची झळाळी बघायला मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर '' हा सामाजिक संदेश देणारी शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या शॉर्ट फिल्ममधून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख प्रेक्षकांसमोर येणार आहेत. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर , सुप्रसिद्ध संगीतकार या दिग्गज मंडळींचा या लघुपटामध्ये सहभाग आहे. दिवाळीच्या सणाला इतरांच्या आयुष्यातही थोडा आनंद कसा आणता येईल हे ही शॉर्ट फिल्म दाखवून देते. याविषयी बोलताना लघुपटाचे दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये म्हणाले, 'सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला, तरी लॉकडाउनमुळे अनेक घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, त्या घटकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद पसरवू या अशी संकल्पना निर्माते पुनीत बालन यांनी मांडली. यातून 'आशेची रोषणाई' या शॉर्ट फिल्मची निर्मिती झाली. लघुपटाची संकल्पना ऐकताक्षणी रितेश देशमुख आणि संगीतकार अजय-अतुल यांनी होकार दिला. बालन यांची संकल्पना लेखक क्षितिज पटवर्धनच्या लेखणीतून उत्तम उतरली आहे. संगीतकार अजय - अतुल यांनी या लघुपटाला अतिशय कमी वेळेत पार्श्वसंगीताचा साज चढवला आहे. तर यांनी अभिनयातून चार चाँद लावले आहेत.' ही शॉर्ट फिल्म युट्यूबवर उपलब्ध आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2U7Pl8R