Full Width(True/False)

आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले प्रत्येक वर्षाचे ९ फोटो

मुंबई- अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी आज ९ वर्षांची झाली. यानिमित्ताने आराध्याचे आजोबा यांनी सोशल मीडियावर आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आराध्याच्या ९ व्या वाढदिवसाला बिग बी यांनी इन्स्टाग्रामवर आराध्याच्या फोटोंचा एक कोलाज शेअर केला. यात आराध्याच्ये नऊ फोटो एकत्र करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षापासून ते नवव्या वर्षांपर्यंतचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यावर्षी अमिताभ बच्चन यांच्याकडे दिवाळी पार्टी नव्हती. बिग बींनी करोना व्हायरस तसेच मुलगी श्वेताची सासू रितू नंदा यांच्या निधनामुळे रद्द केल्याचं याआधीच सांगितलं. असं असलं तरी आराध्याचा वाढदिवस साजरा होईल असा विश्वास अनेकांना आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच आराध्याची आई अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वाढदिवसही झाला. १ नोव्हेंबरला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो. तसे, ऐश्वर्याने तिच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसालाही आराध्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या दोन्ही फोटोंमध्ये आराध्या फारच सुंदर दिसत होती. आता चाहत्यांना आराध्याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर कधी शेअर होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. आतापर्यंतच्या आराध्याच्या वाढदिवसाला मोठी बर्थडे पार्टी देण्यात आली आहे. यात बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी त्यांच्या मुलांसोबत मजा- मस्ती केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2IIzOKy