Full Width(True/False)

स्टार फुटबॉलपटू मॅरेडोना यांच्या निधनानं बॉलिवूड हळहळलं

मुंबई : महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं काल म्हणजेच बुधवारी निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. मॅराडोना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं वृत्त समोर येताच केवळ क्रिडा विश्नातूनच नाही तर सर्वच क्षेत्रातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी देखील मॅराडोना यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता , , ,अभिषेक बच्चन, इशा देओल, मधुर भांडारकर, अनुराग कश्यप अशा अनेक सेलिब्रिटींनी मॅराडोना यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ह्रदयविकाराचा झटका मॅराडोना यांना यापूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर ११ नोव्हेंबरला मॅरेडोना यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. त्यानंतर मॅराडोना यांना ८ दिवसांनी पुन्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं . तेव्हा त्यांच्यावर तातडीनं मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा मॅराडोना यांची गणना महान फुटबॉलपटूंमध्ये केली जायची. अर्जेंटीनाला १९८६ साली फुटबॉल विश्वचषक जिंकवून देण्यात मॅराडोना यांचा मोलाचा वाटा होता. मॅराडोना हे जसे मैदानाबाहेरही आपल्या काही गोष्टींमुळे प्रकाशझोतात आले होते. फुटबॉल खेळत असताना त्यांना चाहत्यांनी देवत्व बहाल केलं होतं. पण 'आपण फुटबॉलचे देव नसून एक सामान्य फुटबॉलपटू आहोत', असे वक्तव्यन मॅराडोना यांनी कोलकातामध्ये आल्यावर एका कार्यक्रमात केलं होतं. उत्तम प्रशिक्षक देखील होते फक्त चांगला खेळाडू नाही तर एक उत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांनी स्वत:ची छाप उमठवली होती. सध्या फुटबॉलमधील आघाडीचा खेळाडू मेसीचा ते मेंटॉर देखील होते. त्याशिवाय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते चर्चेत राहिले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2HDMwKh