Full Width(True/False)

लॅपटॉप किंवा टीव्हीसमोर बसून कंटाळा येतोय; मिनी सीरिजचा आहे पर्याय

दहा ते पंधरा एपिसोड्स...प्रत्येक एपिसोड ४० ते ५० मिनिटांचा...पण, त्यातलं कथानक रंजक वळणं घेत असतं. त्यामुळे अर्ध्यातून उठवत नाही. पण, हातात वेळी मर्यादित असतो. जास्त लांबीच्या सीरिज बघताना तुम्हालाही असं वाटतं का? कारण सहा-सात तास कम्प्युटर, लॅपटॉप किंवा टीव्हीसमोर बसून कंटाळाही येऊ लागतो. अशा परिस्थितीत मिनी सीरिजचा एक पर्याय तुमच्यासमोर आहे. (ओव्हर द टॉप) विश्व देशात हात-पाय पसरू लागलं होतं, तेव्हा मिनी सीरिज मोठ्या प्रमाणात आणल्या गेल्या. प्रेक्षकांना कोणता विषय भावतोय? कोणत्या विषयावर सीरिज होऊ शकतात? हे पडताळून बघण्यासाठी सुरुवातीला या मिनी सीरिज आणल्या गेल्या. कमी लांबीचं कथानक आणि कमी असलेले कलाका यामुळे हा प्रकार आर्थिकदृष्ट्या परवडणाराही होता. त्या लोकप्रिय होऊ लागल्यावर नंतर मिनी सीरिजला प्राधान्य दिलं जाऊ लागलं. तसंच काही कथा चित्रपटातून दाखवायच्या असतात. पण, काही कारणांमुळे तो प्रदर्शित होऊ शकत नाही. अशा कथेचं सीरिजमध्ये रुपांतर केलं जातं, असं तज्ज्ञ सांगतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'घोल' ही सीरिज होय. मिनी सीरिजमध्ये एपिसोड्सची संख्या आणि प्रत्येक एपिसोडचा कालावधी कमी असतो. सर्वसाधारणपणे, या सीरिज बिंज वॉच केल्या जातात. ० मिनी सीरिजची उदाहरणं - पिचर्स - हॉस्टेल डेज - - घोल - वन्स अ इअर (मराठी) - पांडू (मराठी) - मस्तराम - अ सूटेबल बॉय ०००० मिनी सीरिज हा बिंज वॉचिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण, त्या एका बैठकीत बघून होतात. सुरुवातीला आपल्याकडे ओटीटी विश्व हात-पाय पसरत होतं, तेव्हा मिनी सीरिजचा ट्रेंड जोरात होता. प्रयोग करण्याच्या दृष्टीनं मिनी सीरिज हा प्रकार हाताळला जातो. हा प्रकार प्रेक्षकांच्या दृष्टीनं फायद्याचं असतो. - अमोल उद्गीरकर, अभ्यासक ०००० कमी कालावधीत प्रभावीपणे कथानक मांडण्याचं आव्हान असतं. पण, त्यातही वेगळी मजा असते. नियंत्रित लिखाण केलं जातं. कथानक वाहवत जाण्याची शक्यता कमी असते. हातात असलेल्या वेळेत अधिकाधिक क्रिएटीव्ह काम करण्याची संधी असते. प्रयोगशीलतेला यात वाव आहे. - गौरव पवार, लेखक


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3evu8iQ