Full Width(True/False)

हे तर गजनी बायडन; टिकणार नाहीत..कंगनाची टिवटिव थांबेना

मुंबई: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचा विजय झाला. बायडन यांच्या विजयानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत. अमेरिकेत जल्लोष सुरू झालाय. तसंच भारतीय वंशाच्या कमला हॅरीस अमेरिेकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत. असं असलं तरी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिनं जो बायडन यांच्यासंदर्भात केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कंगनानं जो बायडन यांना चक्क 'गजनी' असं संबोधलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळं चर्चेत आहे. आता तर तिनं थेट जो बायडन यांच्यावर निशाणा साधला आहे. ' गजनी बायडन यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. त्यांचा डेटा पाच मिनिटांत क्रॅश होतो (५ मिनिटांत ते गोष्टी विसरतात). त्यांना देण्यात आलेली इतकी औषधं आणि इंजेक्शन त्यामुळं फार ते फार वर्षभर टिकतील. स्पष्ट आहे की, कमला हॅरीय याच शो चालवणार आहेत, असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. कमला हॅरीस यांचं केलं कौतुक डो बायडन यांच्यावर निशाणा साधला असला तरी कमला हॅरीस यांचं कंगनानं कौतुक केलं आहे. जेव्हा एखादी स्त्री जिंकते किंवा पुढं जाते तेव्हा ती प्रत्येक स्त्रीसाठी मार्ग तयार करत असते. असं म्हणत कंगनानं कमला यांचं कौतुक केलंय. कोण आहेत कमला हॅरीस? अमेरिेकेच्या उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्या आहेत. कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्या. आफ्रिकन-अमेरिकन आणि आशियाई-अमेरिकन महिला आहेत. कमला हॅरीस यांच्या आई या भारतीय वंशाच्या डॉक्टर होत्या. तर, वडील जमैकामधील अर्थतज्ञ होते. जो बायडन यांनी हॅरीस यांना 'रनिंग मेट' म्हणून निवडल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. तर, आशियाई-आफ्रिकन मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा रंगली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील हॅरीस यांच्यावर प्रचार सभांमधून अनेकदा टीका केली होती. मात्र, अमेरिकन नागरिकांनी डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन आणि कमला हॅरीस यांच्या पारड्यात भरभरून मतदान केले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3n0FP3Z