Full Width(True/False)

दिशा पाटणीचं निकनेम माहितीए का? टायगरच्या आईने केली कमेन्ट

मुंबई- अलीकडेच दिशा पाटनीने मालदीवमधील तिचे काही सर्वोत्कृष्ट बिकनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताच अवघ्या काही तासांमध्येच ते सोशल मीडियावर व्हायरलही झाले. अनेकांनी दिशाच्या फिगरचं कौतुक केलं आहे. या फोटोंत तिने लाल रंगाची बिकनी घातली आहे. विशेष म्हणजे या फोटोंमुळे चाहत्यांना दिशाचं टोपण नावही कळलं आहे. बर्‍याच वर्षांपासून दिशा आणि टायगर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. पण दोघांनीही याबद्दल कधीच खुलासा केला नाही. दरम्यान, टायगरच्या आईने यांनी दिशाच्या बिकनीमधील फोटोंवर कमेन्ट करत तिला टोपण नावाने हाक मारली आहे. 'वाह दिशू..' अशी कमेन्ट आएशा यांनी किली. टायगरची आईच नाही तर त्याच्या बहिणीने कृष्णा श्रॉफनेही दिशाच्या फोटोंवर कमेन्ट केली आहे. सध्या दिशा मालदीवमध्ये टायगरसोबत वेळ घालवत आहे. यापूर्वी दिशा आणि टायगर एकत्र मुंबई विमानतळावर दिसले होते. हे कपल मालदीवमध्ये दिवाळी साजरी करत आहेत. टायगरने त्याचे अनेक शर्टलेस फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. दोघांच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर अखेर 'वॉर' या सुपरहिट सिनेमात दिसला होता. तर दिशा पाटणीने 'मलंग' सिनेमात अखेरचं काम केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32IVHAp