Full Width(True/False)

अली फजलच्या खऱ्या आयुष्यात आहेत बबल आणि गुड्डू...

मुंबई : '' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझननंही तुफान लोकप्रियता मिळवली आहे. कथा, व्यक्तिरेखा, संवाद, रंजक वळणं, अॅक्शन या सगळ्यामुळे ही सीरिज प्रचंड गाजतेय. कालीन भैय्या, बबलू, गुड्डू या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. गुड्डू ही व्यक्तिरेखा अभिनेता यानं साकारली आहे. गुड्डू आणि बबलू या व्यक्तिरेखांशी त्याचं एक खास नातं आहे. सोशल मीडियावर त्यानं नुकतंच याबाबत सांगितलं. त्यानं मामांबरोबरचे त्याच्या लहानपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याच्या दोन्ही मामांची टोपणनावं बबलू आणि गुड्डू असल्याचं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय. अलीच्या मोठ्या मामाचं टोपणनाव बबलू आहे. तर धाकट्या मामाचं नाव गुड्डू आहे. यो दोघांबरोबरचा फोटो अलीनं शेअर केला आहे. 'मिर्झापूर २'मधल्या कालीन भैय्याप्रमाणेच बबलू आणि गुड्डू या भूमिकांनादेखील प्रेक्षकांची खास पसंती मिळाली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3l3m3Ed