मुंबई: बॉलिवूड अभिनेता याची लेल हिनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत डिप्रेशनमध्ये असल्याचं म्हटलं होतं. नुकताच तिनं आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय. त्या व्हिडिओत इरानं नैराश्यासंदर्भात आणखी काही गोष्टींचे खुलासे केले आहेत. इरा ही आमिर खान आणि रिना दत्ता यांची मुलगी आहे.इरा १४ वर्षांची असताना आमिर आणि रिना यांचा घटस्फोट झाला होता. या घटनेविषयी देखील इरानं तिच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे. पालकांच्या घरस्फोटाहून अधिक धक्कादायत गोष्ट इराच्या आयुष्यात घडली होती. १४ व्या वर्षी इरावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. याचा खुलासा तिनं तिच्या व्हिडिओमध्ये केलाय. नेमकं काय म्हणाली इरा? इरानं एका इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या नैराश्याचे कारण सांगितले. ती म्हणाली, 'मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. वरकरणी सर्व काही ठिक होते. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. परंतु त्या घटनेने माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम केला होता. मी सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी १४ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. अशा अनेक लहान लहान घटना घडत गेल्या, ज्यांचा परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी मित्र-मंडळींसोबत बाहेर जाणे टाळायचे. मी दिवसांतील बहुतांश वेळ केवळ झोपून काढायचे. हळूहळू मी गर्दीत असूनही स्वत:ला एकटी समजू लागले. अखेर मी नैराश्यामध्ये असल्याची जाणीव मला झाली.' इराच्या या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ep81dQ