Full Width(True/False)

अर्णव म्हणाले जीवाला धोका, फिल्ममेकरने लिहिले- एकच राजा मुंबई पोलीस

मुंबई- मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांना अटक केली होती. २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप अर्णव यांच्यावर आहे. नुकतंच त्यांना तळोजा तुरुंगात स्थलांतरीत करण्यात आलं. पोलिसांच्या गाडीतून जाताना अर्णव यांनी रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांनी गाडीच्या आतूनच सांगितले की, त्यांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माते यांनी ट्वीट करत यावर आपलं मत मांडलं. त्यांनी लिहिलं की, 'मुंबईचा राजा कोण? तो म्हणजे आणि हेच एक सत्य आहे.' त्यांच्या या ट्वीटवर यूझरने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी रामू यांचा विरोध केला तर काही यूझरने ट्वीट करून त्यांचं समर्थनही केलं. आनंद नावाच्या एका यूझरने लिहिले की, 'मला माहीत आहे.. पालघर लिंचिंग दरम्यान मी डरपोक पोलिसांना पाहिलं आहे.' सिद्धार्थ नावाच्या एका यूझरने लिहिले की, 'म्हणून तू गोव्याला पळून गेलास का?' सुनील अत्री नावाच्या यूझरने लिहिले की, 'भिकू म्हात्रेला थोड्या वेळासाठी भ्रम झालेला.' तर सोनाजी पोहारे यांनी राम गोपाल वर्मा यांचं समर्थन करत म्हटलं की, 'फक्त मुंबई पोलीस १०० टक्के बरोबर आहेत.' दरम्यान, काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्मा यांनी अजून एक ट्वीट केलं होतं. या पोस्टमध्ये अर्णव यांच्या अटकेवर वर्मा यांनी थेट नाव न घेता या अटकेचा उल्लेख केला. त्यांनी लिहिले की, 'माझ्यासाठी हे पाहणं उत्सुकतेचं होतं की, शिवसेनेचे वाघ उद्धव ठाकरे यांनी वडिलांप्रमाणे हिंम्मत दाखवली आणि भूंकणाऱ्या मांजरीला न्यायालयीन कचाट्यात अडकवण्याचं शौर्य दाखवलं.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lhnSO8