Full Width(True/False)

Vivo V20 Pro भारतात डिसेंबरमध्ये होणार लाँच, किंमत झाली लीक

नवी दिल्लीः च्या भारतात होणाऱ्या स्मार्टफोनची किंमत लाँच आधीच लीक झाली आहे. च्या एका रिपोर्टमध्ये इंडस्ट्री सूत्रांनी दावा केला आहे की, फोन नोव्हेंबर मध्ये लाँच करण्यात येणार नाही. याआधी कंपनीचे इंडिया सीईओ यांनी व्ही २० प्रोला देशात लाँच करणार असल्याची माहिती दिली होती. परंतु आता आलेल्या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, विवोचा हा फोन आता डिसेंबर मध्ये लाँच करण्यात येणार आहे. या फोनची किंमत ३० हजार रुपयांच्या आत असणार आहे. वाचाः Vivo V20 Pro स्मार्टफोन वनप्लस नॉर्डच्या हाय अँड व्हेरियंट प्रमाणे असणार आहे. या प्रो मॉडलला सर्वात आधी सप्टेंबर महिन्यात थायलँडमध्ये लाँच करण्यात आले होते. कंपनीने आधीच Vivo V20 Pro आणि विवो व्ही २० एसई भारतात लाँच केले आहेत. वाचाः Vivo V20 Pro ची संभावित किंमत रिपोर्टच्या माहितीनुसार, Vivo V20 Pro ची किंमत भारतात ३० हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. हे वनप्लस नॉर्डच्या हाय व्हेरियंटशी होणार आहे. याचाच अर्थ Vivo V20 Pro ची किंमत २९ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले जावू शकते. Vivo V20 ला २४ हजार ९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. वाचाः Vivo V20 Pro चे खास वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. ड्यूल सेल्फी कॅमेऱ्यात एक रुंद नॉच दिले आहे. हँडसेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 4000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा सॅमसंग ISOCELL GW1 प्रायमरी सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे. फोनमध्ये ४४ मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचे दोन सेल्फी कॅमेरे दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kkOU5H