Full Width(True/False)

दीपिकाच्या गाडीचा करत होता पाठलाग, मिळाली लीगल अॅक्शनची धमकी

मुंबई- आणि छायाचित्रकार यांचं एक अनोखं नातं आहे. लॉकडाउनमध्ये सेलिब्रिटी घराबाहेर फारसे पडलेच नाहीत. त्यामुळे त्यांचे फारसे फोटो सोशल मीडियावर दिसले नाहीत. पण आता चित्रीकरणा निमित्त ते घराबाहेर पडताना दिसत आहेत. पण यावेळी मात्र दोघांमध्ये बाचाबाची झालेलीही दिसली. दीपिकासोबत होती अनन्या पांडे freepressjournal.com च्या वृत्तानुसार, दीपिकाला धर्मा प्रोडक्शनच्या जुन्या ऑफिसमधून बाहेर निघताना पाहण्यात आलं. तेव्हाच दीपिका एका छायाचित्रकाराला फटकारताना दिसली. यावेळी दीपिकासोबत अभिनेत्री अनन्या पांडेही होती. दोघींचे बरेच फोटो काढल्यानंतर दीपिका गाडीत बसून निघून गेली. मात्र त्यानंतरही फोटो ग्राफर्सनी दीपिकाच्या गाडीचा पाठलाग सुरुच ठेवला होता. दीपिकाच्या बॉडीगार्डसोबत झाली बाचाबाची यावेळी दीपिकाचे अंगरक्षक गाडीतून बाहेर आले आणि ते छायाचित्रकारांशी वाद घालू लागले. हा वाद नंतर एवढा वाढला की, दीपिकाला गाडीतून बाहेर यावं लागलं आणि मध्यस्थी करावी लागली. यानंतरही गोष्ट तिथेच थांबली नाही. अखेर दीपिकाने छायाचित्रकारांना कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TZHomc