मुंबई: मीटू माहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील अनेक लैंगिक अत्याचाराची प्रकरणं समोर येत असतानाच एका प्रसिद्ध अभिनेत्याला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता याला काल रात्री पोलिसांनी तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखील अटक केली आहे. विजय राज यानं त्याच्या आगामी 'शेरनी' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्टाफमधील ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 'शेरनी' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चित्रपटातील कलाकार मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात आणि गोंदियातील हॉटेल गेटवे इथं गेल्या काही दिवसांपासून मुक्कामी राहत आहेत. गोंदियातील हॉटेल गेटवे इथं विजय राज यांनी पीडितेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला गेलाय. पीडितेनं केलेल्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी विजय राजवर विनयभंग केल्याप्रकरणी कलम ३५४(अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eon6wg