नवी दिल्लीः शाओमीने देशात रेडमी ९ ए च्या किंमतीत वाढ केली आहे. रेडमीच्या या फोनला या वर्षी बजेट सेगमेंटमध्ये लाँच केले होते. परंतु, कंपनीने आता २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या किंमतीच्या फोनची किंमत वाढवली आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ केली आहे. रेडमीच्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नाही. वाचाः रेडमी ९ ए ची किंमत रेडमी ९ ए च्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २०० रुपये वाढवण्यात आली आहे. म्हणजेच हा फोन आता ६ हजार ७९९ रुपयांऐवजी ६ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहे. तर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा फोन आधीच्या किंमतीत ७ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकणार आहे. रेडमीच्या या बजेट फोनची नवी किंमत mi.com वर लिस्ट करण्यात आली आहे. या फोनमध्ये डिव्हाईस नेचर ग्रीन, सी ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक कलरमध्ये येते. वाचाः फोनची वैशिष्ट्ये शाओमीच्या रेडमी ९ ए मध्ये ६ ३३ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी पॅनल आहे. स्क्रीनचे आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि रेजॉलूशन 720 x 1600 पिक्सल आहे. स्क्रीनवर एक वॉटरड्रॉप नॉच आहे. ज्यावर फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये २ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी २५ प्रोसेसर दिला आहे. इनबिल्ट स्टोरेज ३२ जीबी दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. हँडसेट पॉलीकार्बोनेट रियर सोबत येते. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश सोबत येते. फोनवर देण्यात आलेल्या वॉटरड्रॉप नॉच मध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये ELB (Enhanced Lifespan battery) टेक्नोलॉजी दिली आहे. नवीन टेक्नोलॉजीसोबत रेडमी ९ ए ची बॅटरी ३ वर्षापर्यंत चालण्याचा दावा आहे. फोनमध्ये AI फेस अनलॉक फीचर दिले आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी ड्यूल 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5, जीपीएस आणि ग्लोनास सपॉर्ट यासारखे फीचर्स दिले आहेत. स्मार्टफोन MIUI 12 वर काम करतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33uv0Qd