मुंबई- 'कौन बनेगा करोडपती १२' च्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये यांनी 'मनुस्मृती' विषयी एक प्रश्न विचारला होता. पण अनेकांना हा प्रश्न न आवडल्याने बिग बींसह '' च्या निर्मात्यांविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 'कर्मवीर स्पेशल' भागात सफाई कर्मचारी आंदोलनाचे सदस्य बेजवाडा विल्सन आणि त्यांची साथ द्यायला टीव्ही स्टार अनूप सोनीही उपस्थित होते. खेळ सुरू झाल्यानंतर, अमिताभ यांनी विल्सन यांना 'मनुस्मृती' बद्दल एक प्रश्न विचारला. २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या होत्या? अ) विष्णु पुराण ब) भगवद्गीता क) ऋग्वेद ड) मनुस्मृती बेजवाडा विल्सन आणि अनूप सोनी यांनी ड. मनुस्मृती हा पर्याय निवडला. जो योग्य होता. ६ लाख ४० हजार रुपयांसाठी विल्सन आणि सोनी यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्नाचं उत्तर समजावताना बिग बी यांनी पुढील स्पष्टीकरण दिलं प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की १९२७ मध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी जातीय भेदभाव आणि अस्पृश्यता यांना वैचारिकदृष्ट्या योग्य मानणाऱ्या 'मनुस्मृती' या प्राचीन हिंदू ग्रंथाचा निषेध करत त्याच्या प्रती जाळल्या होत्या. सोशल मीडियावर निषेध, लखनौमध्ये नोंदवली एफआयआर सध्या सोशल मीडियावर यासंबंधीचा नवीन वाद सुरू झाला असून अनेकांनी या शोचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. तसंच या प्रश्नामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचीही मतं अनेकांनी मांडली. या प्रकरणानंतर आता 'कौन बनेगा करोडपती १२' वर बहिष्कार घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mMtDDJ