नवी दिल्लीः Samsung Galaxy F41च्या किंमतीत कंपनीने कपात केली आहे. कंपनीने नुकतीच एफ सीरीज अंतर्गत हा पहिला स्मार्टफोन लाँच केला होता. गॅलेक्सी एफ ४१ मध्ये ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी तसेच १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. या दोन्ही व्हेरियंटच्या किंमतीत ५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. वाचाः किंमत Samsung Galaxy F41 च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची कपात करण्यात आल्यानंतर हा फोन १५ हजार ४९९ रुपयात तर १२८ जीबी स्टोरेजचा फोन १७ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या दोन्ही फोनच्य किंमती अनुक्रमे १६ हजार ९९९ रुपये आणि १७ हजार ९९९ रुपयांत लाँच केले होते. वाचाः Samsung Galaxy F41 ची खास वैशिष्ट्ये सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080x2340 पिक्सल आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर एक्सीनॉस ९६११ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम सोबत ६४ जीबी व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः गॅलेक्सीच्या या फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनच्या बाजुला फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mPyOml