नवी दिल्लीः इंडियन स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सकडून नवीन इन सीरीजचे फोन लाँच करण्यात आले आहे. ऑनलाइन इव्हेंट मध्ये कंपनीने या सीरीजचे दोन फोन आणि वरून पडदा हटवला आहे. या दोन्ही फोनला कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये आणले आहे. यात मीडियाटेकचे प्रोसेसर दिले आहे. कंपनीने दोन्ही डिव्हाइसेजमध्ये 5000mAh बॅटरी आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः Micromax In सीरीजची किंमत कंपनीचा नवा फोन In Note 1 दोन व्हेरियंट्समध्ये आणाल आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १० हजार ९९९ रुपये ठेवली आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ४९९ रुपये ठेवली आहे. Micromax In 1B च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. तर २ जीबी रॅम प्लस २ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. दोन्ही फोनला फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येईल. याचा सेल २४ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. वाचाः Micromax In Note 1चे वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रेजॉलूशन दिला आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये रियर पॅनलवर AI क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्याासठी 5000mAh बॅटरी तसेच १८ वॉटची चार्जिंग सपोर्ट दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः Micromax In 1B चे वैशिष्ट्ये एन्ट्री लेवल किंमतीत लाँच करण्यात आलेल्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस रिझॉल्यूशन डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये MediaTek चा Helio G35 प्रोसेसर दिला आहे. कॅमेरा सेटअपमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम युजर्संना मिळणार आहे. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. १० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन पर्पल, ब्लू, आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TNvSu5