Full Width(True/False)

Moto G 5G स्मार्टफोन लाँच, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी, किंमत पाहा

नवी दिल्लीः मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या फोनला सध्या यूरोपमध्ये लाँच केले आहे. भारतीय रुपयांप्रमाणे या फोनची किंमत २६ हजार रुपये आहे. मोटोच्या या नवीन फोनमध्ये ५जी नेटवर्क कनेक्टिविटीसोबत ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मोठी बॅटरी यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः मोटो जी ५ जी ची वैशिष्ट्ये हा फोन ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येतो. फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रिझॉल्यूशन दिला आहे. फोनध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले सेंटर पंच होल सोबत येतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. वाचाः यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. जो सॅमसंगच्या GM1 लेंस सोबत येतो. तसचे ८ मेगापिक्सलचा एक अल्ट्रा वाइड अँगल आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनला २० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर काम करतो. फोनची बॉडीच्या राईड साईडला पॉवर आणि व्हॅल्यूम बटन दिले आहे. तसेच लेफ्ट साइडला डेडिकेटेड गुगल असिस्टेंट बटन मिळणार आहे. फोनला फिंगरप्रिंट सेंसर बॅक साइड मध्ये दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/353zvT7