Full Width(True/False)

Viचे बेस्ट पॅक, १०० रुपये किंमतीत ५० जीबीपर्यंत डेटा

नवी दिल्लीः वोडाफोन - आयडिया युजर्संसाठी जबरदस्त प्रीपेड प्लान्स ऑफर केला जात आहे. प्रीपेड प्लान्स सोबत कंपनीच्या पोर्टफोलियोत बेस्ट बेनिफिटच्या पोस्टपेड प्लान्सची काही कमतरता नाही. वर्क फ्रॉम होम मुळे सध्या पोस्टपेड प्लान्सची डिमांड वाढत आहे. ज्यात कमी किंमतीत जास्त डेटा दिला जात आहे. त्यामुळे वोडाफोन-आयडिया आपल्या पोस्टपेड युजर्सला १०० रुपये आणि २०० रुपयांच्या डेटा पॅक ऑफर केला जात आहे. या डेटा पॅकमध्ये ५० जीबी पर्यंत डेटा दिला जात आहे. वाचाः १०० रुपयांत २० जीबी आणि २०० रुपयांत ५० जीबी डेटा वोडाफोन आयडियाच्या पोस्टपेड युजर्ससाठी जास्त डेटा साठी १०० रुपयांच्या डेटा पॅकला निवडू शकता. यात कंपनी २० जीबी डेटा ऑफर करीत आहे. जर २०० रुपयांच्या डेटा पॅकमध्ये ५० जीबी डेटाचा फायदा मिळत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, युजर या डेटा पॅकला कस्टमर सर्विसवर कॉल करून अॅक्टिवेट करू शकतात. वाचाः वाचाः डेटा संपल्यानंतर १ जीबी साठी २० रुपये एअरटेल सुद्धा आपल्या पोस्टपेड़ युजर्ससाठी असाच डेटा पॅक ऑफर करीत आहे. यात १५ जीबी आणि ३५ जीबी डेटाचा फायदा मिळतो. रिलायन्स जिओच्या या ऑफरमध्ये असा कोणताही डेटा पॅक मिळत नाही. जिओ युजर्संना दर महिन्याला मिळणाऱ्या डेटाहून जास्त डेटा खर्च करतात. त्यांना १ जीबीसाठी १० रुपये मोजावे लागतात. वोडाफोन-आयडिया सोबत असेच आहे. परंतु, कंपनी डेटा लिमिट संपल्यानंतर १ जीबी डेटासाठी २० रुपये घेते. वाचाः वाचाः वोडाफोन-आयडियाचे REDX प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा बेनिफिट वोडाफोनच्या ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळतो. वोडाफोन इंटरटेनमेंट प्लस नावाच्या सर्व प्रसिद्ध प्लानमध्ये कॅपिंग सोबत १५० जीबी मिळतो. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएसचा फायदा मिळतो. तसेच यात ९९९ रुपयांचा अॅमेझॉन प्राईम मेंबरशीपसोबत Movies आणि TV चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2U4imm2