Full Width(True/False)

Whatsappचे नवे फीचर आले, मेसेज आपोआप डिलीट होणार

नवी दिल्लीः प्रसिद्ध मेसेजिंग अॅप Whatsapp ने आपले बहुप्रतिक्षीत फीचर अधिकृतपणे लाँच करीत असल्याची घोषणा केली आहे. हे फीचर याच महिन्यात एक अपडेट द्वारे जगभरात जारी करण्यात येणार आहे. या फीचरद्वारे युजर्संना मोठा दिलासा मिळणार आहे. नको असलेले मेसेज आता डिलिट करण्याची गरज उरणार नाही. आता त्यांना पाठवण्यात आलेल्या मेसेजला ७ दिवसानंतर आपोआप डिलीट म्हणजेच गायब होणार आहेत. यासारखे फीचर हे स्नॅपचॅट, टेलिग्राम आणि सिग्नल यासारख्या प्रसिद्ध अॅप्समध्ये आधीच दिसलेले आहे. वाचाः या महिन्यात मिळणार फीचर कंपनीने गुरुवारी डिसअपियरिंग मेसेजस फीचरला रोल आउट करणे सुरू केले आहे. या महिन्याच्या अखेर पर्यंत सर्व डिव्हाइसपर्यंत पोहोचले जाईल. या ठिकाणी व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉयड, आयओएस, लिनक्स आधारित KaiOS,आणि व्हॉट्सअॅप वेब तसेच डेस्कटॉप व्हर्जनवर उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपने नुकतीच या संदर्भात माहिती दिली की, Disappearing Messages फीचर ला कशा प्रकारे इनेबल किंवा डिसेबल करावे लागणार आहे. वाचाः ७ दिवसांत होणार गायब व्हॉट्सअॅपचे हे फीचर टेलिग्राम पेक्षा वेगळे आहे. टेलिग्राम युजर्स ठरवतात किती दिवसांत मेसेज गायब करायचे आहेत. तर व्हॉट्सअॅपवरील मेसेज स्वतःहून ७ दिवसांनंतर गायब होतील. तसेच स्नॅपचॅट मध्ये रिसिवर मध्ये मेसेज पाहिल्यानंतर तात्काळ गायब होतात. व्हॉट्सअॅपने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मेसेज गायब होण्याआधी युजर्संना त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी ७ दिवसांची वेळ ठेवण्यात आली आहे, असे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले. वाचाः या फीचरला प्रत्येक चॅट विंडो, मग तो वैयक्तिक असो किंवा ग्रुप चॅट. साठी वेगळे इनेबल करावे लागणार आहे. यासाठी चॅटच्या नावावर क्लिक करावे लागेल. त्या ठिकाणी ऑप्शन निवडावा लागेल. इनेबल केल्यानंतर युजर्सचे सर्व नवीन मेसेज ७ दिवसांनंतर गायब होतील. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TZQ2B6