नवी दिल्लीः नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपची मार्केटमध्ये एन्ट्री झाली आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आज Nokia PureBook X14 लॅपटॉप लाँच करीत असल्याची घोषणा केली आहे. या लॅपटॉपची किंमत ५९,९९० रुपये आहे. नोकियाच्या Nokia PureBook X14 ची प्री बुकिंग १८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. जाणून घ्या नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपविषयी. वाचाः १४ इंचाचा फुल एचडी एलईडी बॅकलिट स्क्रीन 8GB DDR4 RAM आणि 512GB NVMe SSD सोबत येणाऱ्या या लॅपटॉप मध्ये इंटेल i5 10th Gen क्वॉड-कोर प्रोसेसर दिला आहे. विंडोज १० ओएस सोबत येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये १४ इंचाचा फुल एचडी एलईडी बॅकलिट स्क्रीन दिली आहे. या लॅपटॉपचा स्क्रीन टू बॉडी रेशियो ८६ टक्के आहे. वाचाः डॉल्बी ऑडियो सपोर्ट आणि जबरदस्त ग्राफिक्स नोकिया प्योरबुक एक्स १४ चे वजन १.१ किलोग्रॅम आहे. केवळ 16.8mm रुंदीचा लॅपटॉप खूप स्लिक डिझाइन सोबत येतो. दमदार साउंड साठी या लॅपटॉपमध्ये डॉल्बी ऑडियो सपोर्ट दिला आहे. तर जबरदस्त ग्राफिक्ससाठी या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 1.1 Ghz टर्बो GPU सोबत इंटीग्रेटेड इंटेल UHD 620 ग्राफिक्स कार्ड मिळणार आहे. वाचाः ८ तासांची बॅटरी लाइफ आणि ६५ वॉट चार्जिंग हा लॅपटॉप ८ तासांच्या बॅटरी लाइफ सोबत येतो. बॅटरी लवकर चार्ज होण्यासाठी यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी या लॅपटॉपमध्ये ड्यूल बँड वाय फाय, ब्लूटूथ ५.१ यूएसबी ३.१, यूएसबी २.०, सिंगल HDMI पोर्ट और एक RJ45 पोर्ट दिले आहे. लॅपटॉपमध्ये सिंगल ऑडियो आउट पोर्ट आणि एक माइक पोर्ट दिला आहे. वाचाः विंडोज हेलो फेस अनलॉक फीचर या लॅपटॉपमध्ये मिळणारे अतिरिक्त फीचर म्हणजे यात विंडोज हेलो फेस अनलॉक सोबत HD IR वेबकॅम, अजस्टेबल बॅकलाइटचा कीबोर्ड आणि मल्टिपल जेस्चर ऑप्शनचा टचपॅड दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ml23Nt
