Full Width(True/False)

दिलजीतचं कंगनाला सडेतोड उत्तर, म्हणाला- 'थोडी तरी लाज बाळग'

मुंबई- आणि यांच्यातील ट्विटर वॉर पुन्हा एकदा सुरू झालं आहे. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर दोघंही दररोज नवनवीन ट्वीट शेअर करत आहेत. कंगनाने तिच्या नवीन ट्वीटमध्ये पुन्हा एकदा दिलजीत आणि प्रियांका चोप्रावरही निशाणा साधला होता. यावर दिलजितने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने ट्वीट करत म्हटलं की, 'दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्रा जे शेतकऱ्यांसाठी स्थानिक क्रांतिकारकांची भूमिका वठवत आहेत, त्यांनी किमान एका व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीला विरोध करायचं आहे ते तरी सांगांवं. दोघंही शेतकऱ्यांना भडकवून गायब झाले. आता शेतकऱ्यांची आणि देशाची ही स्थिती आहे.' दिलजीतचं कंगनाला सडेतोड उत्तर दरवेळीप्रमाणे दिलजीतने यावेळीही कंगनाला पंजाबी भाषेत प्रत्युत्तर दिलंं आहे. त्याचं हे ट्वीट आम्ही तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करून सांगत आहोत. दिलजीतने लिहिले की, 'गायब होण्याचं तर सोडून द्या... पण देशद्रोही कोण आहे आणि देशभक्त कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार तिला कोणी ? हा अधिकार कुठून येत आहे? शेतकऱ्यांना या देशाचा देशद्रोही म्हणण्यापूर्वी किमान थोडी लाज वाटायला हवी होती.' कंगनाने केलेला हा प्रश्न केला यापूर्वी कंगनाने प्रियांका आणि दिलजीतला टॅग करून ट्वीट केले होते. 'शेतकरी आंदोलनाची किंमत आतापर्यंत ७० हजार कोटींवर आली आहे. आंदोलनामुळे उद्योग आणि छोट्या कारखान्यांची अर्थव्यवस्था मंदावली आहे. यामुळे दंगली होऊ शकतात. दिलजीत आणि प्रियांका आपल्या कृतीचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला समजलं आहे का.. याची भरपाई कोण करणार?


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oYWQMP