Full Width(True/False)

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड २०२०' घोषणा; 'पाताल लोक', 'द फॅमिली मॅन'चा बोलबाला

मुंबई टाइम्स टीम देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. त्यामुळे गेले आठ महिने चित्रपटगृहं बंद होती. पण, या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक ओटीटीने (ओव्हर द टॉप) भागवली, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या दरम्यान अनेक सिनेनिर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित केल्या. यामुळे करोनादरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरंजनाचं उत्तम साधन बनलं. थिएटर बंद असल्यानं वेब सीरिजचा बोलबाला पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर पहिल्यावहिल्या फ्लिक्स फिल्मफेअर ओटीटी पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्यांदाच पार पडलेल्या फ्लिक्स फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारात कोणत्या वेब सीरिजचा बोलबाला असेल, कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष होतं. यात अनुष्का शर्माची '' ही सर्वोत्कृष्ट वेब सीरिज ठरली. 'पाताल लोक' आणि 'द 'ने प्रत्येकी पाच पुरस्कार तर 'पंचायत' या सीरिजने चार पुरस्कार आपल्या नावावर केले. 'पाताल लोक'साठी अभिनेता जयदीप अहलावतला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर अविनाश अरुण आणि प्रोसित रॉयला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. '' या वेब सीरिजद्वारे डिजिटल विश्वात पदार्पण करणारी सुश्मिता सेन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. तर 'द फॅमिली मॅन' ही क्रिटिक्स विभागात सर्वोत्कृष्ट सीरिज ठरली. याशिवाय, या सीरिजने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागातील क्रिटिक्स पुरस्कारांवर नाव कोरलं. वेब ओरिजनल चित्रपटांमध्ये 'रात अकेली है' चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'बुलबुल'साठी तृप्ती डिमरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rj2ziD