Full Width(True/False)

'सुखी माणसाचा सदरा'मधील मोरू झालाय लोकप्रिय

संपदा जोशी मालिकेत मुख्य कलाकारांबरोबर बालकलाकारही गाजतात. मालिकाविश्वात बालकलाकारांनी त्यांचं एक वेगळंच स्थान निर्माण केलंय. '' या मालिकेतील ही व्यक्तिरेखा साकारणारा या बालकलाकारानंही त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. मालिकेतील अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव श्रेयसनं 'मुंटा'कडे शेअर केला. 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेतून प्रेक्षकांना भरभरून आनंद मिळतोय. मालिकेतला मोरू म्हणजेच श्रेयसही खूप लोकप्रिय झालाय. त्याच्या लोकप्रियतेविषयी तो सांगतो, 'मोरू हे पात्रं प्रेक्षकांना खूप आवडतंय. छान काम करतोस, बघायला मजा येते अशा प्रतिक्रिया मिळत असतात. याआधीही मी काही मालिकांमधून छोट्या भूमिका साकारल्या होत्या. पण मोरूसारखी भूमिका करायला मिळेल असं वाटलं नव्हतं.' दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळल्यानं श्रेयस स्वतःला नशीबवान समजतो. 'मालिकेतील दिग्गज कलाकारांना प्रत्यक्ष पाहिल्यावर मी अवाक् झालो होतो. मी रोज त्यांच्याकडून काहीतरी शिकत असतो. आमच्याकडे बराच अनुभव आहे, असं त्याच्या वागणूकीतून कधीच दिसत नाही. ते खूप साधेपणाने काम करतात. माझं काही चुकलं, मी कुठे अडलो तर भरत सर, केदार दादा, रोहिणी ताई असे सगळेच मला समजावतात', असं तो सांगतो. बालकलाकाराच्या यशामागे त्याच्या शाळेचा वाटा मोठा असतो. याबद्दल श्रेयस म्हणतो, 'मी आता नववीत असून ठाण्याच्या सरस्वती, राबोडी या शाळेत शिकतोय. शाळा नेहमीच पाठीशी उभी राहते. सध्या ऑनलाइन शाळा सुरू असली तरी त्यातही शाळेनं मला काही तासांची सवलत दिली आहे. शाळेच्या ट्रस्टी, मुख्याध्यापिका, शिक्षक यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्यं होतंय. या सगळ्यात आई-बाबांचीही महत्त्वाची साथ मिळते.' श्रेयस आणि मोरू यांच्यात फरक असल्याचंही त्यानं सांगितलंय. मोरूला विषय प्रचंड आवडतो. त्याला अभ्यासाचीच आवड आहे. श्रेयसला मात्रं अभ्यासात फारशी रुची नाही. श्रेयसला बाईक, कार अशा गाड्यांविषयीच्या गोष्टीत रस आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38HVm38