मुंबई: बॉलिवूड अभिनेता मृत्यू प्रकरणानंतर अंमली पदार्थ तस्करांविरोधात धडक कारवाई मोहीम हाती घेणाऱ्या एनसीबीच्या पथकाने मुंबईत मोठ्या ड्रग नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीने ड्रग सप्लायर आणि तस्कर याला अटक केल्यानंतर गुरुवारी बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट याला अटक केली आहे. कोण आहे सुरज गोडांबे?सुरज गोडांबे हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आरटिस्ट आहे . सध्या तो हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आरटिस्ट म्हणून काम पाहत असल्याची माहिती आहे. एनसीबीनं अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात कारवाई करत त्याच्याकडून ११ ग्रॅम इतकं कोकेन जप्त केलं आहे. एनसीबीच्या पथकाने अंधेरीतील लोखंडवालामध्ये छापे मारले. यात मोठ्या प्रमाणात रोकड आणि अंमली पदार्थ आढळून आले. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर एनसीबीने याआधी अनेक जणांना ताब्यात घेतले होते. त्यात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचाही समावेश होता. काही दिवसांपूर्वीच शौविक चक्रवर्तीला जामिनावर सोडण्यात आले आहे. अडीच कोटींची मलाना क्रीम जप्तएनसीबीने बुधवारी दोन ड्रग सप्लायरना अटक केली. त्यांच्याकडून ५ किलो मलाना क्रीम जप्त करण्यात आली आहे. त्याची किंमत २.५ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर १३ लाखांची रोकडही जप्त केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oGVCFN
