Full Width(True/False)

शेतकरी विष पित होते तेव्हा कुठं होतात? ट्रोल करणाऱ्यांना दिलजीतचा सवाल

मुंबई: नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात () शेतकऱ्यांचा जोरदार हल्लाबोल सुरूच आहे. अन्नदात्यांच्या हे आंदोलन सुरू असताना देशातील प्रसिद्ध व्यक्ती देखील या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुढं येत आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिकच उग्र होत असताना अनेक कारणांसाठी चर्चेत आलं आहे. आंदोलक शेतकऱ्यांसाठी पिझ्झा लंगर सुरू करण्यात आलं होतं. काही आदोलकांचे पिझ्झा खातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या आंदोलनाची खिल्ली देखील उडवली जात आहे. यावर अभिनेता यानं ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. शेतकरी विष पित होते तेव्हा कुठे होतात? असा सवालही त्यानं शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्यांना केला आहे. 'व्वा! शेतकरी जेव्हा विष पित होते तेव्हा कुठं होतात? तेव्हा काळजी नव्हती आणि आज त्यांनी पिझ्झा खाल्ला तर चर्चा होतेय.', अशा आशयाचं ट्विट दिलजीतनं केलं आहे. दरम्यान, नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र होऊ लागलंय. बळीराजाच्या आंदोलनाला मनोरंजनसृष्टीतूनही मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. अनेक सिनेकलाकार सोशल मीडियावर व्यक्त होत, आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगताहेत. सोबतच हरभजन मान, , जसबीर जस्सी, रितेश देशमुख, सिनेदिग्दर्शक हन्सल मेहता आणि इतर अनेक नामवंतांनी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qPWqdD