Full Width(True/False)

आम्हाला शिकवू नये ....कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना पूजा सावंतचं सडेतोड उत्तर

मुंबई: कलाकार मंडळी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. कधी-कधी कलाकारांना त्याचा त्रासही सहन करावा लागतो. कारण, नेटकरी कोणत्याही फोटोवरून त्यांना ट्रोल करतात. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री हिच्याबाबत घडला. पण, तिनं त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी पूजाने आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंचं अनेक चाहत्यांनी कौतुक केलं. तिने परिधान केलेल्या कपड्यांवर एका कमेंटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात आली. मग मात्र पूजा संतापली. तिनं कमेंट करणाऱ्याला सुनावलं. त्याला उत्तर देताना पूजा म्हणाली, 'आम्ही काय आणि कसे कपडे घालायचे हे आम्हाला कुणी सांगू नये. मुळात कपडे घालताना आम्हालाही तारतम्य असतं'. तिच्या या प्रत्युत्तराचं कौतुक होतंय. खरंतर पूजाने हे उत्तर देऊन कलाकारांच्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. कलाकार नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्यांना काही बोललं तरी चालतं असा एक समज सोशल मीडियातल्या जगात रुढ होतो आहे. पण, पूजाने चोख उत्तर देऊन तो समज मोडीत काढला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2KCrwVH