Full Width(True/False)

राखी सावंत करणार नवऱ्याची पोल- खोल, म्हणे- त्याला समोर यावंच लागेल

मुंबई- ईटाइम्स टीव्हीशी बोलताना म्हणाली की आता ती वेळ आली आहे की मी माझ्या नवऱ्याची ओळख सर्वांना करून देईन. राखीने ब्रिटनमधील व्यावसायिकाशी रितेशशी लग्न केलं. पण अजूनपर्यंत तिने आपल्या नवऱ्याचा चेहरा का दाखवला नाही असा प्रश्न तिला सातत्याने विचारण्यात येतो. या प्रश्नाचं उत्तर देताना राखी म्हणाली की, 'माझं लग्न खूप कठीण परिस्थिती झालं. त्यामुळे आम्ही लग्नाची कोणतीही घोषणा करू शकलो नाही. लव्ह कम अरेन्ज मॅरेज होतं. पण मी लवकरच सर्व गोष्टी सांगेन. राखी पुढे म्हणाली की तिने आपल्या पतीला सर्वांसमोर येण्यासाठी धमकावलं आहे. 'मला माहीत आहे की माझं लग्न होऊन बराच काळ लोटला आणि चाहत्यांपासून साऱ्यांनाच माझा नवरा पाहण्याची उत्सुकता आहे. त्याचे फोटो पाहण्यासाठी अनेकजण उत्सुकही आहेत. आता जेव्हा मी बिग बॉसमध्ये आले तेव्हा त्याची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला सर्वांसमोर यावंच लागेल अशी धमकीच दिली आहे. सलमान सरांनी माझ्या नवऱ्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तर काय होईल?' राखी सावंतने २०१९ मध्ये एनआरआय रितेशशी लग्न केलंं होतं. यापूर्वी नोव्हेंबर २०१८ मध्ये राखीने ती दिपक कलालशी लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. पण नंतर त्यांनी हे लग्न मोडलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3434VIx