Full Width(True/False)

सिद्धार्थ -मितालीच्या घरी लगीनघाई; शेअर केले केळवणाचे फोटो

मुंबई: मराठी इंडस्ट्रीत अभिनेत्री आणि अभिनेता ही जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आता त्यांच्या केळवणाला सुरूवात झाली आहे. याचे फोटो मितालीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'एंटरिंग द घोडा मैदान' अशी कॅप्शन देत तिनं फोटो पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी तिनं आणखी एक फोटो शेअर केला होता. त्याला तिनं 'मिस्टर अँड मिसेस नेक्स्ट इअर' अशी कॅप्शन दिली होती. त्यामुळे पुढच्या वर्षी यांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. पहिलं केळवण ईशाच्या घरीसिद्धार्थ आणि मिताली यांना अभिनेत्री ईशा केसकर हिनं पहिल्यांदा केळवणासाठी बोलावलं होतं. ईशाच्या घरचे काही फोटो मितालीनं शेअर केले होते. सिनेसृष्टीतील चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक मिताली आणि सिद्धार्थ यांची जोडी आहे. मिताली सिद्धार्थसोबतचे अनेक गोड फोटो शेअर करत असते. पाडव्याच्या शुभेच्छा देताना तिनं पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं . तसंच एक फोटोही पोस्ट केला होता. मितालीनं त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'Mr. and Mrs. next year' हॅप्पी दिवाली', असं म्हटलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nEzMCW