Full Width(True/False)

शाहरुख खानने केली 'बादशाह'सारखी मदत, दान केले इन्जेक्शन्स

मुंबई- शाहरूख खान करोना काळात गरजूंना मदत करत आहे. त्याच्या एका फाउंडेशनने नुकतेच ५०० लोकांना रेमडेसिवीर (Remdesivir) इन्जेक्शन्स विनामूल्य दिले. दिल्लीचे आरोग्यमंत्री यांनी शाहरुखच्या या कार्याबद्दल आभार मानले आहेत. शाहरुख म्हणाला, पुढेही करत राहीन मदत याने ट्वीटचे आभार मानले आणि लिहिले की, मीर फाउंडेशनचे कौतुक केल्याबद्दल सत्येंद्र जी यांचे आभार. जेव्हा आपण सातत्याने एकत्र राहू तेव्हाच या अडचणीवर मात करता येऊ शकते. भविष्यात मदतीसाठी माझी टीम आणि मी देखील नेहमीच हजर राहू. तुमच्या टीमच्या सेवेसाठी धन्यवाद. सत्येंद्र जैन यांनी आभार व्यक्त केले सत्येंद्र जैन यांनी ट्वीट करत म्हटलं की, “जेव्हा आम्हाला सर्वात जास्त गरज भासली गेली तेव्हा रेमडेसिवीर इन्जेक्शन्स दान केल्याबद्दल शाहरुख खान आणि मीर फाउंडेशनचे आम्ही आभारी आहोत.” गरजेच्या वेळी तुमच्याकडून मिळालेल्या मदतीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. यापूर्वीही शाहरुखने केली होती मदत यापूर्वीही शाहरुख खान करोनामुळे पीडित लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. त्याने आरोग्य सेवा कामगारांना पीपीई किट दान केले होते. तसंच क्वारन्टाइन सेन्टर तयार करण्यासाठी त्याने आपलं ऑफिसही वापरायला दिलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WdAB9G